आंदोलनदेश-विदेशपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषसामाजिक

‘लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांची गळचेपी :सतिश काळे

संभाजी ब्रिगेडचे सतिश काळे यांची दोन दिवसानंतर सुटका

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०२ ऑगस्ट २०२६ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्याचा इशारा दिल्यामुळे संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सतिश काळे यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. शहा यांचा दौरा संपेपर्यंत त्यांना वाकड पोलीस स्टेशन येथे ठेवण्यात आले होते. या कारवाईनंतर काळे यांनी पोलिस प्रशासनावर लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या समाजसेवकांची गळचेपी केल्याचा आरोप केला.
अमित शहा हे अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम तसेच लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी पुण्यात येणार होते. या दौऱ्यादरम्यान दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित हल्ल्याच्या निषेधार्थ शांततापूर्ण आंदोलन करण्याबाबत आपण प्रशासनाला पूर्वसूचना दिली होती, असे काळे यांनी सांगितले मात्र आंदोलन होण्यापूर्वीच पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून ताब्यात घेतल्याचा आरोप त्यांनी केला.
काळे म्हणाले संविधानाने प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण मार्गाने निषेध व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे. आम्ही कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणताही प्रयत्न केला नव्हता. तरीही केवळ निषेधाची भूमिका घेतल्यामुळे आम्हाला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई लोकशाही मूल्यांना बाधा आणणारी असून विरोधी मत दडपण्याचा प्रयत्न आहे.
दोन दिवसानंतर मुक्त करण्यात आल्यानंतर काळे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. समाजहिताचे प्रश्न मांडणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखण्याऐवजी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची गरज असल्याचे सांगत लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे अशी मागणी काळे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!