विशेषशहरसामाजिक

त्यागमूर्ती माता रमाई यांचा जन्मदिन आणि स्मृतिदिन महाराष्ट्र राज्य शासकीय नियमावली मध्ये समाविष्ट करावा..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २० सप्टेंबर २०२५ विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समिती, पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने काल महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अनुसूचित जाती कल्याण समितीचे प्रमुख मा.नारायण कुचे यांना त्यागमूर्ती माता रमाई यांचा ०७ फेब्रुवारी जन्मदिन आणि २७ मे स्मृतिदिन हा महाराष्ट्र राज्य शासकीय नियमावली मध्ये समाविष्ट करावा यासाठी निवेदन देण्यात आले. तसेच ३ ते ४ वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहाने असा ठराव देखील बहुमताने करण्यात आल्याचे समितीचे प्रमुख मा. नारायण कुचे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समितीचे निमंत्रक बाळासाहेब रोकडे, बापूसाहेब गायकवाड, संतोष जोगदंड, दीपक भालेराव, गिरीश वाघमारे, दत्ता ठाणांबीर, प्रमोद शेरे, बाबासाहेब वाघमारे यांच्या वतीने समिती प्रमुख मा.नारायण कुचे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत ही करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!