आर्थिकगून्हापूणेमहाराष्ट्रविशेषसामाजिक

मोटार सायकल चोरीच्या गुन्हयात अटक आरोपींकडे कौशल्यपुर्ण तपासात परजिल्हयात क्रुरपणे जबरी चोरी करणा-या टोळीचा महाळुंगे डी.बी. पथकाने केला पर्दाफाश..

महाळुंगे डी.बी. पथकाची दमदार कामगिरी करत चार आरोपी केले अटक…

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २० सप्टेंबर २०२५ पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीतील एम. आय. डी. सी. परिसरात घडणारे गुन्हयांना आळा घालणे व गुन्हेगारांचा शोध घेवुन अटक करणे या संदर्भाने मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड विनय कुमार चौबे यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार यांना सक्त सुचना दिल्या होत्या. त्यानुसार महाळुंगे एम. आय. डी. सी. पोलीस ठाणे हद्दीमध्ये घडलेल्या वाहन चोरीचे गुन्हयाचे संदर्भाने डी.बी.पथकाचे अधिकारी व अंमलदार हे कसोशिने तपास करत होते.
दिनांक १२/०९/२०२५ रोजी सायंकाळी १८.३० वाजताचे सुमारास मौजे सावरदरी, ता. खेड, जि. पुणे, गावचे हद्दीमध्ये इसम नामे प्रशांत चोपडे यांनी ऑस्टोपाईन कंपनीच्या गेटसमोर त्यांचे मालकीची टिव्हीएस रायडर मोटार सायकल पार्क केली असता ती मोटार सायकल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याचे तक्रारी वरुन महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे गु.र.क्र.६७९ / २०२५ बी. एन. एस. कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा समांतर तपास महाळुंगे पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथक (डी.बी) मधील अधिकारी व अंमलदार हे करत असताना दरोडा विरोधी पथक, पुणे शहर यांना संशयीतरित्या मिळालेले इसमांना
पुढील तपास कामी महाळुंगे पोलीस ठाणेकडे वर्ग केले होते. महाळुंगे पोलीस ठाणेकडील डी. बी. पथकाचे प्रभारी सपोनि कल्याण घाडगे व त्यांचे स्टाफ यांनी सदर संशयीत व्यक्तींचा गुन्हेगारी पुर्वइतिहास माहिती प्राप्त केली व त्यांचेकडे सखोल तपास करता वाहन चोरीचे
गुन्हयात त्यांचे सोबत आणखी दोन साथीदार सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्या दोन साथीदारांचा शोध घेवुन त्यांना खेड-राजगुरुनगर परिसरातुन ताब्यात घेवुन वरील गुन्हयात अटक केली. अटक चौघा आरोपींकडे सपोनि कल्याण घाडगे व अंमलदार यांनी तांत्रिक तपासाद्वारे विविध अंगाने कौशल्यपुर्ण तपास केला असता अटक चौघा आरोपींनी कोपरगाव पोलीस ठाणे, जिल्हा अहिल्यानगर व गंगापुर पोलीस ठाणे, जिल्हा छत्रपती संभाजीनगर हद्दीत रात्रीचे वेळी घरामध्ये घुसुन घरातील सदस्यांना मारहाण करत, चाकु व पिस्तुलाचा धाक दाखवुन त्यांचे हातपाय व तोंड बांधुन त्यांचेकडुन सोने व रोख रक्कम असा ऐवज लुटला असल्याचे व त्या संदर्भाने संबंधीत पोलीस ठाणेकडे गुन्हयाची नोंद असल्याचे निष्पन्न झाले.
अटक आरोपींकडुन ७,४१,५००/रु किंमतीचा मुद्देमाल, त्यामध्ये गुन्हयात चोरलेली मोटार सायकल, गुन्हा करण्यासाठी वापरलेली स्विप्टकार, जबरी चोरी करता धाक दाखविण्यासाठी वापरलेले लोखंडी पिस्टल व त्याचे ०३ जिवंत काडतुस असे जप्त करण्यात आले आहे.
अटक आरोपींची नावे :-
१. प्रसाद भारत पांडव वय २५ वर्षे रा. वेरूळ ता. खुलताबाद जि. छञपती संभाजीनगर
२. आशिष राजाराम भोसले वय १९ वर्षे रा. बोल्हेगाव, सावेडी ता. जि. अहिल्यानगर
३. ऋषीकेश नवनाथ धाकतोडे वय २३ वर्ष, रा. गेवराई ता. नेवासा जि.अहिल्यानगर
४. शिवम ऊर्फ पवन रमेश भालेराव वय २१ वर्षे रा. खडकी ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर
अटक आरोपींकडुन उघडकीस आलेले गुन्हे:-
१) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ६७९ / २०२५, बी. एन. एस. कलम ३०३ (२), ३(५)
२) कोपरगाव पो.स्टे जि.अहिल्यानगर, गुन्हा रजि. नं ४००/२०२५, बी.एन.एस.क३०९ (६), ३३३, ३५१ (३), ३५२,
३) गंगापूर पोलीस ठाणे जि.छ. संभाजीनगर गु.र.क्र.३२५/२०२५ बी. एन. एस. कलम ३०९ (६),३३१(४)
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त, डॉ. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, मा. पोलीस उप-आयुक्त बापु बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर
सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, सहा. पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस उप निरीक्षक
रामेश्वर घुले, पोलीस अंमलदार राजु जाधव, राजु कोणकेरी, अमोल बोराटे, युवराज बिराजदार, तानाजी गाडे, विठ्ठल बडेकर, किशोर सांगळे, संतोष काळे, मंगेश कदम, राजकुमार हनुमंते, गणेश गायकवाड, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, राजेंद्र गिरी, हरी रणदिवे, शुभम खंडागळे, शरद खैरे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!