
प्रतिनिधी अकोला दि. १५ ऑगस्ट २०२५ मुर्तिजापुर शहरातील वडरपुरा स्टेशन विभाग, मुर्तिजापुर, जि. अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड पवन संजय गुजांळ, वय २२ वर्ष याचे वर यापुर्वी घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापुर्वक जबर दुखापत पोहोचवणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापुर्वक दुखापत पोहोचवणे, गैर निरोध, पन्नास रूपये इतक्या रकमेच्या नुकसान करून आगळीक करणे, अश्लील कृती आणि गाणी, बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणे, शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, फौजदारीपात्र धाकदपटशा करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे वर यापूर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, परंतु त्याचे वर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता, तो प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरूध्द गंभीर दखल घेण्यात येवुन कुख्यात गुंड पवन संजय गुजांळ, याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता मा. पोलीस अधीक्षक, अकोला यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता. मा. जिल्हादंडाधिकारी, अजित कुंभार यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतः चे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एक वर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दि. १२/०८/२०२५ रोजी पारीत केला.
मा. जिल्हादंडाधिकारी, सा. अकोला यांचे आदेशावरून पवन संजय गुजांळ याचा तात्काळ शोध घेवुन त्यास सदरचा आदेश तामील करून त्यास दिनांक १२/०८/२०२५ रोजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले गेले.
सदरची कार्यवाही पूर्ण करण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक, अर्चित चांडक यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेष्ट्री, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुळकर्णी, उपविभागीय पोलीस अधीकारी वैशाली मुळे, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पोउपनि. माजीद पठाण, पोहेकॉ. ज्ञानेश्वर सैरिसे, पोकों, उदय शुक्ला, तसेच पोलीस स्टेशन मुर्तिजापुर शहर येथील पोनि. अजित जाधव, पोउपनि आशिष शिंदे, पोउपनि गणेश सुर्यवंशी, पोलीस अमंलदार सुरेश पांडे, सविन दांदळे, सचिन दुबे, गजानन खेडकर, मुकेश कंटाळे यांनी परिश्रम घेतले.
अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता राहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांवर येणा-या जि.प. व मनपा निवडणुका, आगामी सण उत्सव काळात एमपीडीए व इतर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे “असा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांनी दिला आहे.



