पिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

आयुक्त फक्त आणि फक्त दादांचेच ऐकतात – माधव पाटील

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ३० सप्टेंबर २०२५ काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार पुन्हा एकदा सकाळी ७ वाजता महानगरपालिकेत जाऊन आयुक्तांना भेटले आणि विविध कामांविषयी चर्चा केली.
यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव पाटील यांनी अजित दादांना पिंपरी चिंचवड शहरात कायमचे राहण्याचे आवाहन केले आहे.
समाज माध्यमातील पोस्टद्वारे माधव पाटील म्हणतात की,
दादांच्या कामाचा झपाटा पाहून मी दादांचा चाहता आहे, होतो आणि कायम असेल. पण प्रत्येक पिंपरी-चिंचवडचे पिंपरी-चिंचवडकर म्हणतात की..
१) खुद्द अजितदादा आल्याशिवाय आयुक्त सुद्धा काम करत नाहीत
२) महायुतीच्या आजी माजी आणि भावी नगरसेवकांचे आयुक्त ऐकत नाही, त्यामुळे गेल्या आठ वर्षात पिंपरी चिंचवडचा काहीही विकास झालेला नाहीये.
३) महायुतीच्या अर्धा डझन लोकप्रतिनिधींचे सुद्धा आयुक्त ऐकत नाहीत.
४) आयुक्त फक्त आणि फक्त अजित दादांचे ऐकतात.
५) त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने १२८ जागांवरती फक्त आणि फक्त अजित दादांना उभे करावे कारण जनता दादांच्या कामाने खूप प्रभावित आहे आणि दादांशिवाय कोणतीही कामे होत नाहीत हे जनतेला कळून चुकले आहे.
मला विश्वास आहे दादांनी पिंपरी चिंचवडमध्ये कायमचा मुक्काम केला तर पुढच्या एका वर्षातच पिंपरी चिंचवडचे सिंगापूर, शांघाय किंवा स्वित्झर्लंड होईल..
हो आम्हाला पिंपरी चिंचवडचा शांघाय, सिंगापूर आणि स्विझरलँड झालेला पाहायचा आहे, दादा तुमचा कायमचा पत्ता पिंपरी चिंचवड करून घ्या ही विनंती.
यावर आता महायुती काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!