आरोग्यपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियानैतिक मूल्यांचे पुरस्कर्ते..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १७ ऑक्टोबर २०२५ वाय. सी. एम. ( यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल ) मध्ये बाळांचे icu व पेशंटचे icu वार्ड वाढवण्या बाबत आयुक्त
हार्डिकर यांना वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया पुणें जिल्हा सचिव सालारभाई शेख यांनी निवेदन देत निदर्शनास आणून दिले की, पिंपरी चिंचवड शहरात मोठा हॉस्पिटल म्हणजे वाय. सी. एम. हॉस्पिटल या ठिकाणी दूर दूर वरून रूग्ण दवाखान्यात येत असतात व उपचार करून घेतात. परंतू इतक्या मोठ्या शहरात हे एकटे हॉस्पिटल तोकडे पडत आहेत सर्व सुख सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना डॉक्टर प्रायव्हेट दवाखान्यात जाण्याचा सल्ला देतात. गरीब जनता या अशा सल्ल्याने कोठे जाणार ? वाय. सी. एम. मधे सतत icu ची कमतरता दिसून येत आहे. डिलिव्हरी साठी लेडीज आली तर त्यांना भीती निर्माण केली जाते की बाळाला icu काचामध्ये ठेवावे लागेल तुम्ही काचाचे बंदोबस्त करा बरेवाईट झाले तर तुम्ही जबाबदार राहणार पेशंट घाबरून महागडे काचेची व्यवस्था करतो आणि दुसरीकडे जे पेशंट सिरीयस आहे त्यांना icu उपलब्ध नसतो कारण तो श्रिमंतांन साठी राखिव असतो अशा वेळी नाईलाजाने त्यांना दुसरीकडे महागड्या दवाखान्यात जावे लागते जर वाय. सी. एम. हे गरिबांसाठी आहे तर त्यांना महागड्या दवाखान्यात का पाठवतात त्यासाठी जर icu उपलब्ध होत नसेल तर icu बाळांचे व पेशंटचे दोन वार्ड वाढवण्यात यावे. जर ते वाढविण्यास पालिका सक्षम नसेल तर गरिब रूग्णांना सल्ल्या ऐवजी मोफत महाडे व मोठे हाॅस्पिटल उपलब्ध करून देण्यात यावे.
यावर तातडीने विचार करून कार्यवाही करावी अन्यथा
या नंतर वेल्फेअर पार्टी कडे ICU उपलब्धतेची तक्रार आली तर वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया जी कार्यवाही करेल याला पूर्णतहा पालिका जबाबदार राहील.
असा इशारा वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया पुणें जिल्हा सचिव सालार भाई शेख यांनी निवेदनातून केली आहे.
यावेळी वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे पुणें जिल्हा सचिव सालार भाई शेख, पिंपरी चिंचवड शहर सचिव रहीम शेख, उपाध्यक्ष ईमाम नदाफ, आमिल सैफी, मौलाना एहसान, खाजा नदाफ, समीर शेख, अरमान तांबोळी, इत्यादी उपस्थित होते.

यावेळी वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्व भारतीय नागरिक यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!