राज्य उत्पादन शुल्क नाशिक भरारी पथक क्र- ०१ ची ऑक्टोबर २०२५ दारुबंदी गांधी सप्ताहकालावधीमध्ये परराज्यातील गोवा बनावटीची विदेशी दारुची अवैद्यरीत्या वाहतुक करणा-या विरोधात धडक कारवाई..

प्रतिनिधी रेणूका गायकवाड महाले नाशिक दि. ०२ ऑक्टोबर २०२५ मा. श्री. डॉ. राजेश देशमुख साहेब, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. श्री. प्रसाद सुर्वे, सह आयुक्त (अंमलबजावणी व दक्षता), महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. श्रीमती उषा वर्मा मॅडम, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, नाशिक तसेच मा. श्री. संतोष झगडे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, नाशिक व मा. श्री. सु. आ. तांबारे, उपअधीक्षक (मु), राज्य उत्पादन शुल्क, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली दि. ०२/१०/२०२५ रोजी परराज्यातील गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची अवैधरीत्या वाहतुक करणा-या विरोधात भरारी पथक क्रमाक ०१ कार्यालयामार्फत खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली.
या कार्यालयास मिळालेल्या गुप्त बातमीनुसार सिन्नर नाशिक रोडवर, शिंदे पळसे टोल नाक्याजवळ, शिंदे गाव ता. जि.नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार वाहन तपासणी सापळा रचला असता दिनांक ०२ / १० / २०२५ रोजी संशयीत एक टाटा कंपनी निर्मित २५१८ मॉडेलचे दहाचाकी वाहन तपासणी कामी थांबवीले असता, सदर वाहनाच्या पुढील दर्शनी बाजुस RJ – १४- GF- ३०१९ असा प्रादेशीक परीवहन क्रमांक नमुद होता. सदरचे वाहनामध्ये परराज्यातील गोवर बनावटीच्या विदेशी मद्याचा रॉयल ब्लु व्हिस्की १८० मि.ली. क्षमतेच्या एकूण ९६००० सिलबंद बाटल्या. / (२००० बॉक्स) आढळुन आल्याने आरोपीत वाहनचालक इसम नामे मांगीलाल रामकिसन वय ३० वर्षे, रा. खिलेरी वास मगरा चोहटन, बारमेर, राजस्थान याचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. सदरील परराज्यातील गोवा बनावटीचे विदेशी मद्य आणि तो मद्यसाठा वाहतुक करणारे टाटा कंपनी निर्मित २५१८ मॉडेलचे दहाचाकी वाहन क्र- RJ-१४- GF- ३०१९ असा एकुण रु.०२,२६,६५०००/- किंमतीचा मुद्देमाल आरोपींचे ताबेकबज्यातुन पुढील तपासकामी जप्त करण्यात आला.
सदर कारवाई भरारी पथक क्र-१ चे निरीक्षक श्री. विलास बामणे, दुय्यम निरीक्षक गणेश बा. नागरगोजे, दुय्यम निरीक्षक संजय सावंत,स.दु.नि पी.वाय. गायकवाड, जवान सर्वश्री दिपक आव्हाड, अमित गांगुर्डे,संदीप देशमुख, व्ही.ए.चव्हाण, सागर पवार, अमन तडवी, महिला जवान अनिता भांड या सर्वांनी मिळुन यशस्वीरित्या पार पाडली. सदरील गुन्हयाचा पुढील तपास श्री. गणेश बा. नागरगोजे, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र-१, नाशिक हे करीत आहेत.
तरी जनतेस आवाहन करण्यात येते की, अवैद्य मद्यनिर्मीती, विक्री, वाहतुक यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्री क्र. १८००२३३९९९९ व व्हॉटसॲप क्र.८४२२००११३३ तसेच दुरध्वनी क्र. ०२५३ / २३१९७४४ वर संपर्क साधावा.



