महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

शहरातील पाणी पूरवठा दुरुस्तीच्या कामा करीता गुरूवार दि. १५ जून रोजी बंद राहणार आहे.

प्रतिनिधी-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडील पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे, सेक्टर क्र.२३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील विद्युत व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे व शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असल्यामुळे गुरूवार दि. १५ जून रोजी पिंपरी चिंचवड शहराचा सकाळचा पाणीपुरवठा नियमीत वेळे नुसार होणार असुन संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवार दि. १६ जून रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल.

तरी नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करुन महपालिकेला सहकार्य करावे, असे श्रीकांत सवणे
सह शहर अभियंता
पाणी पुरवठा विभाग
पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!