
प्रतिनिधी रेणुका गायकवाड नाशिक दि.०७ ऑक्टोबर २०२५ नाशिक रोड परिसरात वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन नाशिक रोड पोलिसांनी सैलानी बाबा, जेल रोड परिसरात रात्रीच्या सुमारास टवळखोरांवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत संशयास्पद आणि टवळखोरी करणाऱ्यांवर कडक नियंत्रण ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.पोलिसांनी सांगितले आहे की, वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर असे कोंबिंग ऑपरेशन नियमितपणे राबवले जात राहणार आहेत, जेणेकरून परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम रहावी आणि नागरिकांना सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. यामुळे स्थानिकांमध्ये गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल असा पोलिसांचा विश्वास आहे.
सैलानी बाबा, जेल रोड आणि नाशिकरोड भागात टवळखोरांविरुद्ध विशेष कारवाई राबवण्यात आली, ज्यात २०० हून अधिक टवळखोरांवर कारवाई करण्यात आली. गुन्हेगारीचा वाढता आलेख कमी करण्यासाठी भविष्यातही अशा कारवाया सुरू राहतील अशी माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे तसेच
स्थानिकांना देखील अशा टवाळखुरांविरुद्ध तक्रारी करण्यासाठी हेल्पलाइन नंबर ९९२३३२३३११ वर संपर्क करायला आवाहन करण्यात आले आहे.



