
प्रतिनिधी सोलापूर दि. ०६ ऑक्टोबर २०२५ आगामी काळात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि पुढील वर्षी होऊ घातलेल्या पदवीधर निवडणुकांच्या अनुषंगाने महत्त्वाची बैठक जिल्हा निरीक्षक व राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
सोलापूर वंचित बहुजन आघाडी शहर व जिल्हा नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका या निवडणुका अतिशय ताकदीने लढणार असून त्याचबरोबर पदवीधर मतदार संघाची निवडणूक सुद्धा आम्ही ताकदीने लढवणार आहोत याच तयारी करिता आजची ही बैठक आयोजित करण्यात आली होती अशी माहिती प्राध्यापक सोमनाथ साळुंखे यांनी दिली.
या बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांनी केले तसेच सर्व तालुका अध्यक्ष युवक शहराध्यक्ष महिला अध्यक्ष सर्व तालुका शहराध्यक्ष व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.



