तक्रार तुमची दखल आमची.. चिंचवड विधानसभेतील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठीमेघराज लोखंडे यांचा अभिनव उपक्रम..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०७ एप्रिल २०२५ चिंचवड विधानसभेतील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी
मेघराज लोखंडे अध्यक्ष चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी जनता दरबाराचे आयोजन नवी सांगवी येथे केले होते..! यामध्ये नागरिकांनी आपल्या भागातील समस्या मेघराज लोखंडे यांच्या पर्यंत पोहोचवल्या व नागरिकांच्या समस्या समजून घेत संपूर्ण समस्यांवरती तोडगा काढण्यात येईल व लवकरात लवकर त्या ठिकाणी कामाला सुरुवात होईल व मी त्यावर प्रयत्नशील राहील असे मेघराज लोखंडे यांनी आश्वासन दिले आहे.
नागरिकांच्या समस्या मध्ये सर्वात जास्त समस्या म.न.पा अधिकाऱ्यांसंदर्भात आहे. यात नागरिकांनी अधिकार्यांना अडचणी सांगितल्यास अधिकारी उलट सूलट उत्तर देत टाळाटाळ करणे तसेच पाणी व वीज पुरवठा सुरळीत न होणे, ट्राफिक समस्या, रस्त्याचे अपूर्ण काम, कचरा गोळा करणारी गाडी वेळेवर न येणे, रस्त्यावरील स्ट्रीट लाईट नेहमी बंद असणे, तुंबलेले स्ट्रोम वॉटर लाईन व ड्रेनेज, भटके कुत्रे, रस्त्यावरील वाढलेल्या अस्तावेस्त झाडची छाटणी, मेन चौकात बेकायदेशीरपणे कार पार्किंग तसेच अंतर्गत रस्त्यावरील खड्डे व रास्ता साफ करणारे कर्मचारी नागरकांशी अरेरावेची भाषा करणे आशा देखील समस्या
या जनता दरबारात उघड झाल्या मेघराज लोखंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांसमोरच फोन लावून जाब विचारात काम करण्याच्या सूचना केल्या..!
या जनता दरबारात नागरिकांनी उत्सुकत प्रतिसाद दिला..!
या जनता दरबाराला प्रियाताई देशमुख, निकिता एकाड विजय धोदाड, आशिष, तेजस पाटील, धम्मदीप गायकवाड, अभिषेक केसकर, साहिल भिंगार्डे, सचिन कांबळे, प्रदीप खाटमोडे, रोहन चौधरी व जेकब पाटोळे उपस्थित होते.



