
प्रतीनीधी सतिश पाटील मुबंई दि. ६ ऑक्टोबर २०२५ सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न न्यायालयात काय घडले?
सरन्यायाधीश गवई प्रतिमा स्रोत, एएनआय प्रतिमा मथळा, काही दिवसांपूर्वी एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीशांनी भगवान विष्णूंवर टिप्पणी केली होती.
आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बीआर गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.
न्यायालयात उपस्थित असलेले वकील अनस तनवीर यांनी घटनेची पुष्टी केली.
या घटनेची माहिती देताना अनस तन्वीर म्हणाले, “आज सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेंव्हा काही काळ गोंधळ उडाला. यानंतर त्या वकिलाला बाहेर काढताना, त्याने घोषणा दिली – भारत सनातनचा अपमान सहन करणार नाही.”
अनस तन्वीर म्हणतात की या घटनेदरम्यान न्यायमूर्ती गवई शांत राहिले आणि त्यांनी सुनावणी सुरूच ठेवली.
सनातनचा अपमान सहन करणार नाही असं म्हणत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर एका वकिलाने कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न केला. ही घटना फक्त न्यायालयासाठीच नाही, तर पूर्ण देशासाठी शरमेची बाब आहे. धर्माच्या नावावर उन्माद माजवणारे हे लोक धर्माचे ठेकेदार नाहीत, तर समाजात विष पसरवणारे माथेफिरू आहेत. असे पडसाद जनमानसातून येत आहेत.
आज देशात विचार, तर्क आणि संयम यांची जागा धर्मांधतेने घेतली आहे. हा लोकशाही आणि न्यायसंस्थेवर उघड हल्ला आहे. हे सगळं वातावरण कुणी तयार केलं? गेल्या काही वर्षांत भाजप-आरएसएस सरकारने समाजात जे धार्मिक उन्मादाचं बी पेरलं, त्याचेच हे विषारी परिणाम आहेत.
सरकारला ठाम मागणी आहे की अशा प्रकारे न्यायासनाचा अवमान करणाऱ्या व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि न्यायव्यवस्थेचा सन्मान अबाधित राहील यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत. असे जनसामान्यांतून भावना व्यक्त होत आहे.
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर माथेफिरू वकिलातर्फे अपमानास्पद हल्ल्याचा प्रयत्न झाला. असे करणाऱ्यांवर न्यायालयीन चौकशीची मागणी अँड. सुलेखाताई कुंभारे यानी केली आहे.



