पिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

ते आले, त्यांनी लुटले आणि कुंभमेळ्याला बदली होऊन गेले-माधव पाटील

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०८ ऑक्टोबर २०२५ पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांची नाशिकच्या महाकुंभमेळाच्या आयुक्तपदी बदली झाली.
पण आयुक्तांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते माधव पाटील यांनी समाजमाध्यमांवर सडकून टीका केली.
तीन वर्षाच्या कार्यकाळात काही लोकप्रतिनिधींची मर्जी सांभाळत पिंपरी चिंचवडकरांच्या कराची अमाप लूट केली.
पाटील पुढे म्हणाले की आयुक्त हे किमान ५००० कोटी रुपये शहरातून भ्रष्ट मार्गाने घेऊन आता कुंभमेळा लुटायला चालले आहेत.
त्यांना,
गेल्या तीन वर्षात अनेक वेळा कुत्र्यांच्या नसबंदी संदर्भात, नदीचे जलपर्णी साफसफाई करण्यात किती घोटाळा झाला याची श्वेतपत्रिका काढा हे सांगून सांगून दमलो. पालिकेचे IT चे ५ कोटींचे कंत्राट १५० कोटींना दिले, १.२५ किलोमीटरचा रस्ता ८ कोटीत दिला. चिखली येथे अनेक उद्योजकांच्या उद्योगांवर बुलडोझर फिरवून त्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी केली. २०० कोटीची हरितबाॅंड म्हणजेच भीकबाँड काढून हरित कंत्राटदारसाठी भीक मागितली.
पाटील या कारकिर्दीचे वर्णनकरताना बोलले की..
” ते आले त, यांनी लुटलं आणि आता महा कुंभमेळ्यात पाप फेडायला चाललेत “.
नवीन येणारे आयुक्त कोणाच्या हातातले भावले नसतील हीच अपेक्षा माधव पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!