अध्यक्ष पदाच्या शर्यतीत विजयश्रीचे मानकरी ठरले भिमराव तूरूकमारे..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०७ फेब्रूवारी २०२४ अखिल मराठी पत्रकार संस्था सलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया सलग्न पिंपरी चिंचवड डिजिटल मीडियाची २०२४ -२५ लोकशाही पध्दतीने निवडणूक घेण्यात आली. दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १२ वा. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली त्या मध्ये भीमराव तुरुकमारे, मुकेश जाधव,आणि श्रीधर जगताप यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. प्रत्येकाला माघारी घेण्यासाठी १५ मि. वेळ देण्यात आली. मुकेश जाधव व श्रीधर जगताप यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतले. भीमराव तुरुकमारे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने अखेर भीमराव तुरुकमारे यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या वेळी अखिल मराठी पत्रकार संस्था संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी शुभेच्छा दिल्या. पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ तसेच पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया हे संस्थापक बापूसाहेब गोरे यांच्या मार्गदर्शना खाली काम करीत आहेत. निवडणूक प्रर्कीया अत्यंत साध्या परंतु लोकशाही पद्धतीने पार पडली.
यावेळी लक्ष्मण रोकडे, प्रसाद बोरसे, मुकेश जाधव, श्रीधर जगताप, विनोद शिंदे, माणिक पौळ, प्रा. यशवंत गायकवाड, मुकुंद कदम, शफीक चांद शेख, आदी सभासद उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव यांनी तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून पिंपरी चिंचवड शहर संघाचे सरचिटणीस महेश मंगवडे यांनी काम पाहिले नंतर सायंकाळी इतर कार्यकारणीची निवड सर्वानूमते झाली. नवनिर्वाचित कार्यकारणी मध्ये अध्यक्ष – भीमराव तूरुकमारे, समन्वयक- मुकेश जाधव, उपाध्यक्ष- प्रा.यशवंत गायकवाड, खजिनदार- प्रसाद बोरसे, सह खजिनदार-श्रीधर जगताप, सचिव- माणिक पौळ
सह सचिव- मुकुंद कदम व कार्यकारिनी सदस्य – विनोद शिंदे, सदस्य-लक्ष्मण रोकडे, शफिक चांद शेख या नंतर बापूसाहेब गोरे, सायलीताई कुलकर्णी, दादाराव आढाव यांनी नवनिर्वाचित सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार संतोष जराड, संजय बोरा,विनय लोंढे, अमोल डंबाळे, सुहास आढाव, कलिंदर शेख आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते.



