
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २३ एप्रिल २०२४ पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात बेकायदेशीर अग्निशस्त्रे बाळगून त्याद्वारे समाजात दहशत माजविणा-या गुन्हेगारांवर कारवाई करणे बाबत मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी कारवाई करणेकरिता आदेशीत कले आहे.
मा. पोलीस आयुक्त सो, यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे श्री. निवृत्ती कोल्हटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी तपास पथकाकील अधिकारी व अंमलदार यांना वाकड पोलीस स्टेशन हद्दीत सतर्कपणे गस्त करुन तसेच अचानक नाकाबंदी व रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तपासुन बेकायदेशीर अग्निशस्त्रे बाळगणारे खरेदी विक्री करणारे यांचेवर कारवाईच्या सुचना दिल्या आहे.
त्यानूसार दि. २१/०४/२०२४ रोजी १९.३० वा सुमारास वाकड पोलीस ठाणे तपास पथकातील पोहवा. अतिक शेख व पोशि. अजय फल्ले यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीप्रमाणे रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहीत ऊर्फ बॉन्ड राहुल शिंदे वय २० वर्षे, रा. गुलमोहर कॉलनी, रहाटणी पुणे हा डिमार्ट मागिल नदीपात्राचे रोड लगत जगताप नगर येथून पोउपनि अनिरुध्द सावर्डे व तपास पथकातील अंलदार यांनी ताब्यात घेतले.
त्याचेकडे २७,०००/- रु. किं.चे एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस मिळून आल्याने त्याचे विरुध्द वाकड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ५०२/२०२४ भारताचा शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३,२५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून नमूद गुन्ह्यात त्यास अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास पोउपनि अनिरुध्द सावर्डे हे करीत आहेत.
अटक आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभुमी खालील प्रमाणे..
१) वाकड पो.स्टे. – गु.र.नं. ९५२/२०२४ – कलम – भा.दं.वि.क ३०८,३८७,४२७, ५०४, ३२३, ५०६, ३४, आर्म ॲक्ट ४,२५ मपोका ३७ (१) (३) सह १३५. क्रि. लॉ. अ. ॲ.क. ३ व ७
२) वाकड पो.स्टे. – गु.र.नं. ४७२/२०२३ – कलम – भा.द.वि. ३९९, आर्म ॲक्ट ४, २५ मपोका ३७ (१) (३) सह १३५,
३) वाकड पो.स्टे. – गु.र.नं. ४८०/२०२३ – कलम – भा.द.वि. ३९४, आर्म ॲक्ट ४, २५ मपोका ३७ (१) (३) सह १३५,
४) वाकड पो.स्टे. – गु.र.नं. ४५४/२०२३ – कलम – भा.द.वि. ३९४, ३२३, ५०४, ५०६, ३४
सदरची उल्लेखनीय कारवाई मा. श्री.विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, श्री. बापु बांगर सो, पोलीस उप आयुक्त, परि-२ श्री. डॉ.विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त सो, वाकड विभाग यांचे मार्गदर्शना खाली श्री. निवृत्ती
कोल्हटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोउपनि सचिन चव्हाण, पोउपनि अनिरुध्द् सावर्डे, श्रेणी पोउपनि बिभीषण कन्हेरकर, श्रेणी पोउपनि बाबाजान इनामदार, सपोफौ. राजेंद्र काळे, पोहवा. वंदु गिरे, अतिश जाधव, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, पोना. प्रशांत गिलबीले, रामचंद्र तळपे, पोशि. विनायक घार्गे, अजय फल्ले, सौदागर लामतुरे, कौंतेय खराडे, रमेश खेडकर, ज्ञानदेव झेंडे यांनी मिळुन केली आहे.



