गून्हानाशिकमहाराष्ट्रशहरसामाजिक

पोलिस गस्तीने दिला चोराला झटका! नाशिकरोड पोलिसांनी अट्टल दुचाकी चोराला जेरबंद करत ५ गुन्ह्यांचा केला पर्दाफाश..

प्रतिनिधि रेणुका गायकवाड नाशिक दि. १७ जून २०२६ नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने गस्ती दरम्यान मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला अटक करून त्याच्याकडून पाच चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे नाशिकरोड आणि आहिल्यानगर परिसरातील एकूण ५  मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून सुमारे १ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उप आयुक्त परीमंडळ २ किशोर काळे, पोलीस सहा आयुक्त संगीत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
     नाशिकरोड पोलिस ठाण्यात गु. राजि.नं ३६१/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल, गुन्हेशोध पथकातील पोहवा. विशाल पाटील, पोहवा. सागर आडणे, पोहवा. महेंद्र जाधव, पोहवा. अरुण गाडेकर, पोहवा. रोहित शिंदे, पोहवा. योगेश राबडे, पोहवा. अर्जुन गीते हे गस्तीवर होते. त्यावेळी सिन्नर फाटा परिसरातील डी.बी. मोबाइल शॉप जवळ गस्त घालत असताना महाराष्ट रसवंती गृह येथे १ संशयित व्यक्ति साध्या वेशातील पोलिस बघून अर्धवट रसाचा ग्लास सोडून दुचाकी वर बसून पळ काढू लागला, पथकातील पोलिस अंमलदार यांना संशय आल्याने त्यांनी त्याला तत्काळ पकडून सदर दुचाकीचे कागदपत्रे व इतर माहिती विचारली असता त्याने स्वताचे नाव ललित देवरे रा. सिन्नर, नाशिक अशी माहिती दिली, गुन्हे शोध पथकाने याबाबत विविध पोलिस स्टेशन येथील अभिलेखवरील माहिती शोधली असता कल्याण संहित अनेक पो. स्टे. मध्ये देवेरे याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली व हा एक सराईत चोर असल्याबबत निष्पन्न झाले, चौकशीत त्याने विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये हिरो होंडा स्प्लेंडर, सुझुकी अॅक्सेस, टीव्हीएस विगो आणि होंडा युनिकॉर्न या वाहनांचा समावेश आहे.
    पोलिस तपासात नाशिकरोड पोलिस ठाण्यातील आणि आहिल्यानगर पोलिस ठाण्यातील  अशा एकूण पाच गुन्ह्यांची उकल झाली. जप्त करण्यात आलेल्या पाच वाहनांची एकूण किंमत १ लाख ७८ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
   या उल्लेखनीय कारवाईमुळे मोटारसायकल चोरीच्या मालिकेचा पर्दाफाश झाला असून नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करावीत तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन नाशिकरोड पोलिसांनी केले आहे.

चौकट : जप्त केलेली वाहने
हिरो होंडा स्प्लेंडर (MH 15 AY 2174)
सुझुकी अॅक्सेस (MH 15 FC 4015)
हिरो होंडा स्प्लेंडर (MH 15 BC 1054)
टीव्हीएस विगो (MH 15 FE 7389)
होंडा युनिकॉर्न (MH 17 CT 9943)
एकूण मुद्देमाल : ₹ १,७८,०००/

उघडकीस आलेले गुन्हे :

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!