अभिनंदनमहाराष्ट्रविशेषशुभेच्छासामाजिक

प्रा.ज्योत्स्ना गायकवाड यांना राज्यशास्त्र विषयात पी एच.डी पदवी..

प्रतिनिधी गणेश धनवडे इंदापूर दि. १९ जून २०२६ इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब-वालचंदनगर ता.इंदापूर जि.पुणे येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ ज्योत्स्ना गंगाराम गायकवाड-वाघमारे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्यावतीने राज्यशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली. गायकवाड यांनी पी एचडी प्राप्त केल्याबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाविद्यालय प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग, डॉ. प्रशांत शिंदे इत्यादी मान्यवर महाविद्यालयीन प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. गायकवाड यांच्या प्रबंधाचा विषय “उच्चशिक्षित महिलांचा राजकीय सहभाग: एक चिकित्सक अभ्यास (विशेष संदर्भ लातूर जिल्हा)”हा होता. त्याचे मार्गदर्शक प्रा.डॉ. व्ही.एल एरंडे माजी प्राचार्य महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा व सहमार्गदर्शक प्रा.डाॅ.महादेव गव्हाणे प्राचार्य राज्यर्षी शाहू महाविद्यालय लातूर होते.
डॉ. गायकवाड यांनी पी एचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम, खजिनदार विरबाला पाटील, विश्वस्त कुलदीप हेगडे, विश्वस्त शंकरराव रणसिंग, विश्वस्त राही रणसिंग यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!