आरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

मोहननगर चिंचवड येथील राज्य कामगार विमा रूग्णालयास आमदार अण्णा बनसोडेयानी भेट देवून सोयी सुविधांचा घेतला आढावा.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २०जानेवारी २०२४ पिंपरी चिंचवड शहर ही उद्योग नगरी आहे या शहराला उद्योग नगरी म्हणून बहुमान मिळवण्यामध्ये इथे राहत असलेल्या कष्टकरी कामगारांचा मोलाचा वाटा आहे. त्या कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न देखील तितकाच महत्वाचा आहे कारण याच राबत्या हातांमुळे शहराचे आर्थिक स्वास्थ्य अबाधित आहे. काल मोहननगर चिंचवड येथील राज्य कामगार विमा रूग्णालयास (ESIC) आमदार अण्णा बनसोडे यांनी भेट दिली व तिथे पुरविल्या जाणाऱ्या सोयी सुविधांचा आढावा घेतला. येत्या काही दिवसात ESIC हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अतिदक्षता विभाग तातडीने सुरू करण्यासाठी कटिबद्ध असणार आहे. असे आमदार बनसोडे यांनी यावेळी सांगीतले तसेच रुग्णालयात ऑपरेशन होण्यासाठी लागणारी यंत्र सामुग्री व डायग्नोसिस विभाग सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. असे ही ते बोलले. ESIC हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. वर्षा सुपे यांनी संपूर्ण हॉस्पिटलच्या कामकाजाची माहिती दिली. काल झालेल्या या भेटी दरम्यान निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय इंगळे, प्रशासन अधिकारी श्री. संजय दांगट, श्री. धनपाल सोनकांबळे यांनी हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या सोयी सुविधा व अडचणी याबाबत उहापोह केला या सर्व गोष्टीवर तातडीने शासन स्तरावरून उपाय योजना केली जाईल अशी ग्वाही यावेळी आमदार अण्णा बनसोडे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!