
विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर दि. ०८ जूलै २०२५ काल छत्रपती संभाजी नगर येथे धार्मिक कार्यकर्ते नितीन कांबळे यांना राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समिती तर्फे पुरस्कार देण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी, गोरगरिब लोकांना हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळून देणारे, वेगवेगळ्या क्षेत्रात, चांगली कामे करणाऱ्यांना “समाज भूषण”, काहीना “समाज गौरव” म्हणून सन्मानित केले पण समितीने नितीन कांबळे यांची वेगळी दखल घेऊन १०१ लोकांमधून फक्त एकट्याला “महाराष्ट्र रत्न” या पूरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समिती छत्रपती संभाजीनगर घाटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगरचे डीन. मा. शिवाजी शुक्रे साहेब यांचे हस्ते २०२४-२५ “महाराष्ट्र रत्न” म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी बाळासाहेब चव्हाण, महेंद्र कांबळे, अजय अहिरे, विशाल लोंढे, अनिल कांबळे, टायगर, उपस्थित होते.
पूरस्कार स्विकारल्या नंतर नितिन कांबळेंनी सर्वांचे आभारमानले तसेच कोरेगावभीमा विजय रन स्तंभ सेवा समिती, प्रबुद्ध भारत प्रतिष्ठानच्या सर्व सहकार्यांचे देखिल आभार मानले.



