उत्सवदेश-विदेशपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

प्रजासत्ताक दिनानिमित्त भरारी महिला फाउंडेशनच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

प्रतिनिधी पिंपरी -चिंचवड दि. 27 जानेवारी 2026 काल देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच निमित्ताने भरारी महिला फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुलांचा सहभाग आणि मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
सांस्कृतिक कार्यक्रम:
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे लहान मुलांनी सादर केलेले विविध नृत्यप्रकार. मोठ्या संख्येने मुलांनी यात सहभाग घेऊन आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.
नवनियुक्त नगरसेविकांचा सत्कार:
नुकत्याच नगरसेविकापदी निवडून आलेल्या निकिता कदम यांचा याप्रसंगी विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या पुढील वाटचालीस सर्व उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.
बक्षीस आणि खाऊ वाटप:
सहभागी मुलांना विजय सुतार यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
प्रमुख उपस्थिती:
सोहळ्यासाठी संस्थेच्या कार्याध्यक्षा सुशिलाताई पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे नेटके आणि प्रभावी सूत्रसंचालन स्नेहाताई मोरे यांनी केले.
यावेळी भरारी महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा आशाताई इंगळे यांनी सहभागी सर्व मुलांचे आणि पालकांचे उपस्थिती करिता मनःपूर्वक अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!