विमान अपघातात अजित पवार उपमुख्यमंत्री यांचा दुर्दैवी निधन!

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. 28जानेवारी 2026 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे हे भीषण दुर्घटना बारामती जवळ घडली लँडिंगच्या तयारीत असताना विमान अचानक खाली कोसळले आणि त्यानंतर भीषण स्पोट झाला या अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सह विमानातील सर्व प्रवाशांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार हे खाजगी एस आर कंपनीच्या विमानाने प्रवास करीत होते विमानात एकूण पाच जण होते हे विमान मुंबईवरून सकाळी 8:10 मिनिटांनी रवाना झाले होते. आणि 8:50 वाजता बारामतीत लँडिंग होणे अपेक्षित होतं मात्र लँडिंगपूर्वीच विमानाचा अपघात झाला.
अपघातात सर्व मृत्युमुखी पडलेल्याची नावे-
1) अजितदादा अनंतराव पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,
2) एच. सी. विदीप जाधव मुंबई (पी एस ओ),
3) कॅप्टन सुमित कपूर (पायलट), कॅप्टन शांभवी पाठक(सह पायलट),
4) पिंकी माली (फ्लाईट अटेंडंट), अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून राज्यभरातून शोक व्यक्त केला जात आहे. प्रशासन, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
हा घात कि अपघात याची सविस्तर चौकशी व्हावी हिच अपेक्षा!
दादांना अनुवाद आपला न्युजच्या वतीने भावपूर्ण आदरांजली 🙏🙏🙏



