
प्रतिनिधी-दिनांक : 27/04/2023 रोजी
कोणत्याही प्रकारची पूर्व सुचना न देता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय अतिक्रमण विभागाने सूडबुध्दीने पाडले विश्वरन्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हजारो भिम अनुयायांसमवेत सलग तीन दिवस मोठ्या जल्लोष्यात साजरी केली. त्यामुळे जाधववाडी येथील काही जातीयवाद्यांना ते पचनी पडले नाही. त्याच्या मनात जळमटे ठेवून जाधववाडीतील काही प्रस्थापितांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला हाताशी धरून गेली चार वर्ष त्या ठिकाणी अस्तित्वात असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व त्यालगत असलेले वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय ज्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा फोटो व तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुध्द यांचे फोटो असलेले वाचनालय व कार्यालय महानगर पालिकेने कोणतीही पूर्व सुचना न देता आज दि.27/04/2023 रोजी जमीनदोस्त केले.
यापूर्वीही आमचे बूध्द विहार तोडण्यात आले होते. अनेक पत्रव्यवहारा नंतर बूध्द विहारासाठी पर्यायी जागा देतो असे मागील आयुक्तांनी 6 ते 7 वर्षापूर्वी सांगितले होते. परंतु आजतागायत वारंवार पत्रव्यवहार करून ही महानगरपालिका आश्वासन देवून सुध्दा त्याचा निकाल लावत नाही. जाधववाडी या भागातील असंख्य असे प्रस्थापितांचे वाचनालय, पक्षांची कार्यालये व प्रस्थापितांचे मोठ-मोठे पत्राशेड, अनाधिकृत बांधकामे आहेत. ती आजतागायत का पाडली जात नाही…
हे न उमजणारे कोडे आहे. फक्त आमच्या सोबतच हा दुजाभाव का ? अशी शंका उदभवते. मा. आयुक्त शेखर सिंह साहेब, गेल्या 7 वर्षापासून रेंगाळत असलेले बूध्दविहाराची जागा तसेच गेली 4 वर्षांपासून असलेली
वाचनालय व वंचित बहुजन आघाडी पक्षकार्यालयाची जागा आम्हांला महानगरपालिकेने लवकरात लवकर अधिकृत करुन द्यावी. तसेच संबंधित अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करुन आज रोजी भुईसपाट केलेले वाचनालय व कार्यालय याची भरपाई करुन देण्यात यावी ही विनंती. याबाबत ठोस निर्णय घेण्यात यावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने व समस्त भीम अनूयायांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन व अमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे अनिल भारती अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी भोसरी विधानसभा व अध्यक्ष तक्षशिला फांऊडेशन यांनी सांगीतले.




