६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व बौद्धजन मंडळ नेहरूनगर च्या ५२व्या वर्धापन दिना निमित्त शिलरत्न बूद्धविहारात धम्म सोहळा संपन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १६ ऑक्टोबर २०२५ “मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही” असे विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला मुक्कामी घोषणा केली होती. त्या नंतर दि. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर मधील दीक्षाभूमी येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अंदाजे ६,००,००० अनुयायांच्या बौद्ध स्वीकृतीचा उत्सव साजरा केला तोच हा दिवस आहे. याचे औचित्य साधून १४ ऑक्टोबर १९७३ रोजी नेहरूनगर येथे बौद्धजन मंडळ नेहरूनगर या नावाने बूद्ध, धम्म, संघ विचारावर कामकाज करणारी संघटना (मंडळ) सूरू झाली. यात संस्थापकिय कार्यकारणी अशी होती..
१) अध्यक्ष- आयु गिरीधारी चोखा अडसुळे
२) उपाध्यक्ष-आयु. सखाराम अर्जुन कदम
३) जन. सेक्रेटरी-आयु. सुखदेव रूपाजी नरवाडे
४) जॉ. सेक्रेटरी-आयु. उत्तम तुकाराम नरवाडे
५) खजिनदार-आयु. रामचंद्र बाबु घाडगे
६) अ.हिशोब तपासणीस आयु. लक्ष्मण नथुबा जाधव
७) व्यवस्थापक-आयु. बजरंग कोंडिबा तागतोडे उर्फ मास्तर
८) सल्लागार –
आयु. गोरखनाथ बळीराम बनसोडे / आयु. निवृती पुनाजी चव्हाण
९) कार्यकरणी सदस्य –
आयु. राम मारुती पगारे, आयु. साहेबराव आण्णा सरवदे, आयु. निवृत्ती दगडू भोसले, आयु. सोनबा भुजंगराव सरोदे अशी ही टीम होती.
काल झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बौद्धजन मंडळाचे वरिष्ठ सदस्य डी. के. खिराडे होते तर प्रमूख वक्ते डि. व्ही. सुरवसे व रामचंद्र आचलकर हे होते यावेळी मंडळाचे वरिष्ठ सदस्य रामचंद्र सदाफूले व मंडळाचे बौद्धाचार्य बी. आर. गायकवाड, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश नाना जाधव यांची प्रमूख उपस्थिती होती. यावेळी प्रमूख वक्ते डि. व्ही. सुरवसे यांनी चारऋध्दिपाद या विषयावर सखोल माहिती उपस्थितांना दिली. तसेच रामचंद्र आचलकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष डी. के. खिराडे, माणिक निसर्गंध, निळकंठ तागतोडे, यांनी आपले विचार मांडले.
यावेळी मंडळाचे जनरल सेक्रेटरी शरद उघडे यांनी प्रस्तावना केली. या सूवर्ण क्षणी मंडळाचा ५२ वर्षाचा प्रवास सांगताना मंडळाचे अध्यक्ष प्रकाश नाना जाधव म्हणाले की बौद्धजन मंडळ नेहरूनगर या आपल्या मंडळाचा आज वर्धापन दिन ५२ वर्षा पूर्वी म्हणजे १४ ऑक्टोबर १९७३ ला मंडळाची स्थापना झाली. असे समजा की त्या वेळी लावलेले बोधिवृक्षाचे रोपटे आज बहरलेले महा बोधीवृक्षाचे स्वरूप प्राप्तकरून आपल्या समोर आहे.
आपल्या मंडळाचे नाव घेताच काही आठवणी समोर येतात मंडळाचे संस्थापकीय व्यवस्थापक बजरंग तागतोडे (मास्तर), पहिले अध्यक्ष गिरीधारी अडसूळ, एस. आर. नरवाडे, राम पगारे, सखाराम कदम, हरिभाऊ चव्हाण, ए. बी. पातारे, दामोदर रोकडे, नावे घ्यावी तेव्हडी कमीच पूढे दूसरी पिढी पूढे आली व धम्माच्या मार्गावर काम करणारे वाढतच गेले दूसर्या पिढीचे सूरेश हरिभाऊ चव्हाण, विजय सखाराम कदम, लक्ष्मण दामोदर रोकडे, सचिन नरवाडे, आनंद नरवाडे, तिसर्या पिढीतून तागतोडे मास्तरांचे नातू निलकठ तागतोडे यात एक व्यक्ती अशी ही होती ते होते माझे वडिल नाना जाधव कोणते ही पद न घेता या प्रवासात सतत सोबत राहिले त्यांचा वारसा घेत मी देखिल दहावर्षा पूर्वी या प्रवासाचा प्रवाशी झालो या धम्म प्रवासात वेळोवेळी वाढ होतच गेली. यात काही नावे माझेकडून राहिली ही असती त्याबद्धल क्षमस्व, बस मंडळाचा प्रवास सांगणे हा हेतू होता वेळेचे बंधन ही आहेच म्हणून फक्त मोजकीच नावे घेतली असो हा ५२ वर्षाचा इतिहास सांगताना मला आनंद होतो की काल पर्यंत सभासद असलेल्या नाना जाधवांचा मूलगा आज या कर्म भूमी असलेल्या ५२ वर्षे धम्म चळवळ जिवंत ठेवणार्या मंडळाचा अध्यक्ष आहे. आपण मला ही संधी दिली त्या करीता आपणासर्वांस दोन्ही हात जोडून धन्यवाद. आपण दिलेल्या संधीचे मी व माझे सहकारी सोने करू व धम्म संस्कारात नविन काही करून दाखवू “जिथे कमी तिथे आम्ही नक्कीच असू” असे वचन देवून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचा शेवट भोजनदानाने झाला. या सर्व कार्यक्रमाची व्यवस्था मंडळाची संपूर्ण कमिटीने चोख पार पाडली यात प्रामूख्याने पडद्या मागील नावे या प्रमाणे..
प्रकाश नाना जाधव, शरद दिगंबर उघडे, सागर मोहन खरात, लक्ष्मण दामोदर रोकडे यांनी बजावली
यावेळी मंडळाची संपूर्ण कमीटी प्रामूख्याने उपस्थित होती. यात
अध्यक्ष- प्रकाश नाना जाधव
जनरल सेक्रेटरी- शरद दिगंबर उघडे
खजिनदार- सागर मोहन खरात
उपाध्यक्ष- आनंद सुखदेव नरवाडे
जॉइंट सेक्रेटरी- गिरीशकुमार भारती
अ. हि. तपासणीस- रंगनाथ जंगम सोनटक्के
सल्लागार :
राम मारुती पगारे
अमृता भिमाजी पातारे
लक्ष्मण दामोदर रोकडे
शांताराम गोरखनाथ बनसोडे
दत्तात्रय कोंडीबा खिराडे
निळकंठ शिवदास तागतोडे
उमेश कल्लाप्पा बनसोडे
बौध्दाचार्य
बि. आर. गायकवाड
व्यवस्थापक- विक्रम लक्ष्मण धनवे
कार्यकारिणी सदस्य :
मनिषा दत्तात्रय जाधव
सुमित्रा रामचंद्र सदाफुले
सुनिल देवराम पाडाळे
प्रदिप शंकर कदम
राहुल मनोहर गायकवाड तसेच मागिल कार्यकारणीचे सर्व कार्यकारणी सदस्य व बौद्धजन मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते.



