उत्सवपिंपरी-चिंचवडमनोरंजनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

भोईर नगर येथे दिपावली निमित्त ‘सुरमयी दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे भाऊसाहेब भोईर यांचे वतिने आयोजन संपन्न..

प्रतिनिधी चिंचवड, दि. २१ ऑक्टोबर २०२५ प्रकाशाच्या लखलखाटात आणि आनंदाच्या उत्सवी वातावरणात चिंचवड परिसरातील रसिक संगीतप्रेमींची दिवाळीची पहाट यंदा अविस्मरणीय ठरली. भोईर नगर येथील मनिषा स्मृती निवास येथे मा. नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या निवासस्थानी कै. मनिषा भाऊसाहेब भोईर ट्रस्ट आणि परिवार यांच्या वतीने सालाबादप्रमाणे आयोजित ‘सुरमयी दिवाळी पहाट’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
संगीताच्या रेशमी तारा, सुरांच्या लहरी आणि तालवाद्यांच्या झंकाराने अवघे वातावरण भारले गेले होते. ‘सूर निरागस हो…’ या लोकप्रिय भावगीताने या सुरेल सोहळ्याची मंत्रमुग्ध करणारी सुरुवात झाली.
या सुरेल सोहळ्यात संगीताच्या रेशमी तारा, सुरांच्या लहरी आणि संगीताच्या स्वरांनी रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. गायक वादकांनी रसिकांच्या मनांवर आपल्या शब्दसुरांनी लहर सोडली. त्यानंतर बंदिशी वादनांनी कार्यक्रमाला गोडवा आणला, तर, अभंग आणि भक्तिगीतांनी उपस्थितांची मने भक्तिरसाने ओथंबली,
‘सूर निरागस हो…’ या भावगीताने अजिंक्य देशपांडे यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. मधुसुदन ओझा यांनी ‘विठ्ठल आवडी प्रेम भावे’ आणि ‘मोरया’ भार्गव जाधव यांनी ‘विठू कैवल्याचा’ पियुष भोंडे यांनी ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’ तसेच ‘आली ठुमकत नार’ हि गीते सादर करत भक्तीमय वातावरण निर्माण केले. तबल्यावर तेजस जाधव यांनी साथ दिली. मानसी भोईर घुले व भाऊसाहेब भोईर यांचे ‘प्रीतीचा झुळ झुळ पाणी’, तसेच अमोल यादव व कोमल यादव यांचे ‘अश्विनी येना’, आणि सार्थक भोसले व मानसी भोसले यांचे ‘मधुमास नवा’ तसेच अजिंक्य देशपांडे व पियुष भोंडे यांच्या ‘शिर्डीवाले साई बाबा’ या द्वंद्वगीतांना रसिकांची विशेष दाद मिळाली.
सॅक्सोफोन वादक पियुष तिवारी यांनी ‘गुलाबी आंखे’ हे इन्स्ट्रुमेंटल सादर केले. तसेच, पियुष तिवारी आणि सचिन वाघमारे यांनी बासरी आणि सॅक्सोफोनची मनमोहक जुगलबंदी सादर केली.
या संपूर्ण कार्यक्रमाला वाद्यवृंदाच्या मांदियाळीने अप्रतिम रंग चढवला. सुनील जाधव (कीबोर्ड), सचिन वाघमारे (बासरी), पियुष तिवारी (सॅक्सोफोन), प्रवीण जाधव (ऑक्टोपॅड / रिदम मशीन), प्रमोद शेंडगे (पखवाज, ढोलक, ढोलकी) आणि चंद्रशेखर गायकवाड (तबला / काँगो) यांनी आपल्या वादनकौशल्याने कार्यक्रमाची उंची वाढवली. ध्वनी संयोजन फिरोज रमजानी यांनी केले होते.
शेकडो रसिक संगीतप्रेमींनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला दाद दिली. संगीत आणि आनंदाच्या या अभ्यंगस्नानाने चिंचवड परिसरातील नागरिकांची दिवाळीची पहाट अविस्मरणीय झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!