आंदोलनपिंपरी चिंचवड मनपा.महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

राजमाता अहिल्यादेवी होळकर बी आर टी बसस्टोप मोरवाडी येथील नामफलकाचे नुतनीकरण तात्काळ करा – युवराज दाखले

प्रतिनीधी पिंपरी-चिंचवड दि. २९ मे २०२५ राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३००वी जयंती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्याचं नियोजन करण्यात आले आहे.
परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिका लगत असलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर बी. आर. टी. बस थांबा मोरवाडी येथील नावाचे विडंबना झालेले आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचे विडंबना बहुजन समाज व शिवशाही व्यापारी संघ कदापी सहन करणार नाही. ३१ मे २०२५ ला जयंतीच्या आगोदर नविन नामफलक बसविण्यात यावा अन्यथा प्रशासनाला पुष्पहार अर्पण करु दिला जाणार नाही असा इशारा शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button