
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २९ मे २०२५ शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिंपरी विधानसभा समन्वयक तसेच मातोश्री सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
गणेश आहेर यांना शहरातील विविध क्षेत्रातील राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने शुभेच्छा देवून अभिष्टचिंतन ही करण्यात आले.
गणेश आहेर यांची राजकीय कारकीर्द ही सामाजिक जाणिवेतुन सुरवात झालेली असून ते दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवून आपला जन्मदिन साजरा करतात. त्यांच्या उपक्रमाची शहरात जोरदार चर्चा होत असते. यावेळी शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हा संघटीका सौ. अनिताताई तुतारे, महिला शहर संघटक सौ. रुपालीताई आल्हाट, महिला जिल्हा समन्वयक सौ. सुशीलाताई पवार, विभाग संघटिका सुजाताताई नखाते, तसलीम शेख, पूनम रेठे, विभाग प्रमुख गोरख पाटील, शाखा प्रमुख नरसिंग माने, भरत इंगळे, अंकुश पवार, बाळासाहेब जम, राजू निकम, बाळासाहेब गायकवाड, दीपक भक्त, कुदळे भाऊ, तसेच सर्व शिवसैनिक व मित्र परिवार उपस्थितीत होते.



