गून्हापोलिसमहाराष्ट्रसामाजिक

“रक्षकच बनला भक्षक” सातारा येथे महिला डॉक्टरवर २ पोलिसांकडून बलात्कार..

प्रतिनीधी सतिश पाटील मुंबई दि. २४ ऑक्टोबर २०२५ मृत्यूपूर्वी हातावर सुसाईड नोट लिहिली, सातारा हादरला.
महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी हातावर सुसाईड नोट लिहिली. यात महिलेनं दोन पोलिसांवर गंभीर आरोप केले. शारीरिक अन् मानसिक छळाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं.
साताऱ्यात उपजिल्हा रूग्णालयातील महिला डॉक्टरनं हॉटेलमध्ये आयुष्य संपवलं. हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. संबंधित महिला डॉक्टर पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. दरम्यान, य़ाच त्रासाला कंटाळून महिलेनं टोकाचा निर्णय घेतला. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. महिला डॉक्टरच्या हातावर लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे.
डॉ. संपदा मुंडे असं महिला डॉक्टरचे नाव असल्याची माहिती आहे. महिला डॉक्टरने परिसरातील हॉटेलमध्ये गळफास लावून आयुष्य संपवलं. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तिच्या हातावर पोलिसांना सुसाईड नोट सापडली.
धक्कादायक! साताऱ्यातील महिला डॉक्टरनं आयुष्याचा दोर कापला; हॉटेलमधील खोलीत आढळला मृतदेह
सुसाईड नोटमधून महिलेनं दोन पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. महिलेनं सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, ‘माझ्या आत्महत्या कऱण्य़ामागचं कारण पोलीस निरिक्षक गोपाळ बदने आहेत. त्यांनी माझ्यावर ४ वेळा बलात्कार केला. तर, पोलीस प्रशांत बनकर यांनी माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला’, असं महिलेनं हातावरील सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
या प्रकरणी डॉ. संपदा मुंडे यांच्या काकाने महत्वाची माहिती दिली आहे. महिलेला शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘माझ्या पुतणीनं हॉटेलमध्ये जाऊन आत्महत्या केली. तिच्यावर कामाचा दबाव होता. पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून देण्यासाठी काही लोकांकडून तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. अधिकाऱ्यांचा त्रास होतोय. मी आत्महत्या करेन, असंही पुतणी म्हणायची. डीवायएसपींकडे लेखी तक्रार देऊन लक्ष दिले गेले नाही’ अशी माहिती डॉक्टर महिलेच्या काकांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे. यानंतर पोलिसांकडून गोपाळ बदनेचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे. पण या संदर्भात दूर्लक्ष करणारे DY SP यांच्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई कधी करणार कारण DY SP त्यांनी तक्रार घेतली असती तर ? कदाचित हा दुर्दैवी प्रकार टाळता आला असता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!