RSS विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या जनआक्रोश मोर्चात फुले-शाहू-आंबेडकरवादी दर्दींची गर्दी..

प्रतिनिधी छत्रपती संभाजी नगर दि. २५ ऑक्टोबर २०२५ काल छत्रपती संभाजी नगर शहरात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने RSS च्या कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने शिव फुले, शाहू, आंबेडकरवाद्यांनी यात सहभाग घेतला. RSS च्या कार्यालयावर जावून निवेदन देणार होते पण निवेदन घेण्याऐवजी RSS च्या कार्यकर्त्यांनी केले पलायन.
कोट
आम्ही अत्यंत शांततामय मार्गाने RSSच्या कार्यालयात जाऊन त्यांना भारतीय संविधान, तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्टची एक कॉपी देणार होतो, त्याच आधी RSS वाल्यांनी ऑफिस बंद असल्याचे सांगून पळ काढला. शेवटी छत्रपती संभाजी नगर DCP यांनी ते स्वीकारले.
यातून पुन्हा एकदा हे सिद्ध झाले की, पळपूटी RSS अजूनही भारतीय संविधान, तिरंगा याविषयी द्वेष बाळगते, म्हणून ते समोर आले नाहीत.- सुजात आंबेडकर
सुजात आंबेडकर वंचित बहुजन आघाडीने विचारलेले काही प्रश्न…
◆ वंचित बहुजन आघाडी भारतीय संविधानाची प्रत पळपूट्या आरएसएसला देऊ इच्छित होती, कारण, ते संविधानाचा आदर करत नाही!
◆ वंचित बहुजन आघाडी भारतीय ध्वज (तिरंगा) पळपूट्या आरएसएसला देऊ इच्छित होती, कारण, ते भारतीय ध्वजाचा आदर करत नाही!
◆ वंचित बहुजन आघाडी पळपूट्या आरएसएसला महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट कायद्याची प्रत नोंदणीकृत नसलेल्या आरएसएसला देऊ इच्छित होती जेणेकरून ते स्वतःची नोंदणी करू शकेल!
परंतु, आरएसएसने भारतीय संविधान, भारतीय ध्वज आणि महाराष्ट्र सार्वजनिक न्यास कायद्याच्या प्रती घेण्यासा नकार दिला. कारण त्यांच्यात तेव्हडी देखील हिम्मत नव्हती.
ही लढाई मनुवाद विरुध्द शिव, फुले, शाहू, आंबेडकरवादी अशी आहे.
कालच्या ऐतिहासिक जन आक्रोश मोर्च्यात सहभागी झालेल्या सर्व फुले, शाहू, आंबेडकरवाद्यांचे धन्यवाद!
असे सुजात आंबेडकर युवा नेते, वंचित बहुजन आघाडी यानी यावेळी बोलले.



