घोटाळेदेश-विदेशविशेषसामाजिक

मोदी सरकारने एलआयसीच्या माध्यमातून अदानीला दिले ३२ हजार कोटी रुपये “द वॉशिंग्टन पोस्टने केला दावा”

मोदींच्या कॉर्पोरेट मित्राला वाचवण्यासाठी वापरला गरिब, मध्यमवर्गीयांच्या विम्याचा पैसा!

प्रतिनिधी नवी दिल्ली दि. २५ ऑक्टोबर २०२५ या वर्षाच्या सुरूवातीलाच जेव्हां अदानी समूहाचे मालक गौतम अदानी प्रचंड कर्जात बुडाले होते, अमेरिकेमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करत होते आणि अनेक बड्या युरोपीयन व अमेरिकी बँका त्यांना मदत करण्यासाठी धजावत नव्हत्या, तेव्हां मोदी सरकार आणि सरकारी विमा कंपनी लाईफ इंन्श्योरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एलआयसी त्यांना सावरण्यासाठी पुढे आले होते. मोदी सरकारच्या योजनेनुसार एलआयसीने
तेव्हां अदानी समूहाच्या उद्योगात तब्बल ३.९ अब्ज डॉलर्स म्हणजेच ३२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती, असा खळबळजनक दावा “द वॉशिंग्टन पोस्टने” केला आहे. एलआयसीमध्ये गरिब, मध्यमवर्गीय आणि ग्रामीण भागातील लोकांच्या विम्याचा पैसा गुंतवलेला असतो. त्यामुळे कॉर्पोरेट मित्राला वाचवण्यासाठी मोदी सरकारने गरिब व मध्यमवर्गीयांच्या घामाचा पैसा का वापरला?, असा सवाल केला जात आहे.
अमेरिकेतील प्रतिष्ठित वृत्तपत्र असलेल्या द वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, या वर्षाच्या सुरूवातीलाच सुमारे ९० अब्ज डॉलरच्या संपत्तीचे मालक असलेले गौतम अदानी प्रचंड कर्जात बुडाले होते. त्यांच्या कोळसा खाणी, विमानतळ, बंदरे आणि हरित ऊर्जासारख्या उद्योगांवर कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. शिवाय अमेरिकी अधिकाऱ्यांनी मागच्या वर्षी त्यांच्यावर लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप केले होते. त्यामुळे अमेरिका आणि युरोपातील अनेक बड्या बँका त्यांना कर्ज देण्यास कचरत होत्या. परंतु या संकटाच्या काळात मोदी सरकारने अदानी समूहाच्या मदतीसाठी मोठा प्लान तयार केला. आणि तब्बल ३.९ अब्ज डॉलर्स म्हणजेच ३२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!