
प्रतिनिधी पूणे दि. २५ ऑक्टोबर २०२५ धम्मचक्र प्रवर्तन दिन २०२५ च्या निमित्ताने सेव्ह बुद्धा केव्ज अँड हेरिटेज, लेणी संवर्धक टीम पुणे आणि तक्षशिला बुद्ध विहार पाच बिल्डिंग, ताडीवाला रोड पुणे व यांच्या संयुक्त विद्यमाने चक्रवती सम्राट अशोकाने बांधलेल्या बौद्ध लेण्यांचे, स्तूपांचे भव्य असे प्रदर्शन ११ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर पर्यंत विहारात भरवण्यात आले आहे. त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटला. विहाराच्या तळमजला व पहिला मजल्यावर सर्वांनी खूप परिश्रम घेऊन सुंदर असे बौद्ध लेणी प्रदर्शन भरविले आहे. सर्वांनी लेण्यांचे जतन, संवर्धन, संरक्षण केले पाहिजे तसेच लेण्यान बद्दल जागृती प्रचार प्रसार केला पाहिजे , तसेच सर्व विहारांनी पुढे येऊन बौद्ध लेणी प्रदर्शन भरवले पाहिजे असे लेणी संवर्धक सेव्ह बुद्धा केव्ज अँड हेरिटेजचे दीपक अण्णा गायकवाड व सचिन खुडे यांनी सांगितले. लेणी प्रदर्शनास, अभ्यासक, लेणी प्रेमी, लेणी संवर्धक, विविध भागातील मान्यवर, उपासक-उपासिका शाळेतील मुले मुले यांनी भेट दिली. सुंदर रित्या भरविले गेलेले लेणी प्रदर्शन पाहून सर्वजण भारावून गेले. प्रबुद्ध मैत्री संघ आदर्श नगर मोशी पुणे यांच्या वतीने लेणी प्रेमी धम्म सेवक राजू चंद्रकांत कांबळे, अर्चना कांबळे, प्रियंका कांबळे, लेणी प्रेमी अशोक तूपसौंदर तसेच संबोधी फाउंडेशनच्या रागिनी कोरके व ॲड. मनोज ओव्हाळ आवर्जून वेळ काढून काल उपस्थित होते. सेव्ह बुद्धा केव्हज अँड हेरिटेज लेणी संवर्धक टीम पुणे व तक्षशिला बुद्ध विहाराचे राजेश आढाव, मंगल सिंग कुशवाह व अजय चव्हाण, बाबासाहेब सोनवणे, आनंद हिरवे, विकास जगताप यांनी लेणी प्रदर्शन यशस्वी करण्यास परिश्रम घेतले



