संभाजीनगर MSEB च्या कार्यालयातील तात्पूर्त्या स्वरूपातील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यावरती कारवाई करण्याची आंदोलनातून मागणी..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २५ ऑक्टोबर २०२५ कार्यकारी अभियंता भोसरी येथील कार्यालयासमोर भिमशाही युवा संघटनेचे आंदोलन संभाजीनगर MSEB च्या कार्यालयातील तात्पूर्त्या स्वरूपातील गूंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यावरती कारवाई करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजन नायर यांनी सांगीतले की आठ दिवसांमध्ये संबंधित गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यावरती कारवाई न केल्यास पुणे येथील रास्ता पेठच्या MSEB कार्यालयासमोर शहरातील समविचारी संघटनांना सोबत घेऊन मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
संभाजीनगर येथील MSEB च्या कार्यालयातील कॉन्ट्रॅक्ट बेस वरील कर्मचारी वीज ग्राहकांशी उद्धट व आरेरावीची, गुंडगिरीची, भाषा करत असल्याने त्याच्या वरती निलंबनाची कारवाई करावी. अशी मागणी काल झालेल्या आंदोलनातन करण्यात आली. सदर गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांवरती व त्याच्या ठेकेदारावर आठ दिवसाच्या आत कारवाई करावी असे मत भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष शांताराम खुडे यांनी व्यक्त केले. भिमशाही युवा संघटनेच्या वतीने मुख्य अभियंता रास्ता पेठ, पुणे. कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल.
आजच्या आंदोलनातुन संबंधित ठेकेदार व गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यावरती कारवाई करावी ही प्रमुख मागणी भीमशाही युवा संघटनेच्या वतिने करण्यात आली.
सदर आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते कमलेश वाळके व भिमशाही युवा संघटना संस्थापक अध्यक्ष शिवशंकर उबाळे यांनी केले. आंदोलनामध्ये जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजन नायर. भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शांताराम खुडे. सचिन कसबे, सद्दाम शेख, ऋषिकेश गायकवाड, अमोल घाडगे, आकाश सोनवणे, बाळासाहेब जाधव, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



