महाराष्ट्रविशेषशहर

पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने वाहत्या नाल्यामध्ये नियमांचे भंग करून अनाधिकृत पणे एस. टी.पी. प्लॅटचे केले बांधकाम..

प्रतिनिधी-पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील
मौजे चिखली, कुदळवाडी येथील जाधववाडी ते इंद्रायणी नदीस मिळणाऱ्या नाल्यात, कुदळवाडी येथे पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने अनाधिकृतपणे अंदाजे २० ते २५ पिलर टाकून एस. टी. पी. प्लॅटचे बांधकाम सुरू केले आहे. सदर एस. टी. पी. प्लॅटची पहाणी केली असता ते प्रत्यक्षात मोठया प्रमाणात इमारतीचे बांधकाम असुन, त्यामध्ये आर.सी.सी. पिलर हे नाल्याच्या मधोमध वहात्या पाण्यात टाकण्यात आलेले आहे, तसेच सदरचे बांधकाम हे बांधकामाच्या कोणत्याही नियमांना बांधील असल्याचे प्रत्यक्षात दिसुन येत नसुन, सदरचे बांधकाम हे पुर्णपणे अनाधिकृत व जिवघेणी असे आहे. त्याच प्रमाणे सदर बांधकामाला जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही परवानगी दिलेली नाही तसेच महापालिकेच्या बांधकाम विभागाने या नाल्यात बांधलेल्या एस. टी. पी. प्लॅटला परवानगी दिलेली नाही. तरी बांधकाम हे नाल्याच्या शेजारी किंवा नाल्याच्या लगत नसुन सदरचे बांधकाम हे नाल्यावरच आहे. जमिनीची पुर्ण माहिती न घेता किंवा सदर जमिन बांधकाम करण्या योग्य आहे किंवा नाही याचा विचार न करता करण्यात आलेले आहे. सदरचे बांधकाम हे पुर्णपणे अनाधिकृतपद्धतीने करण्यात येत असुन, सदरचे बांधकाम हे पिं. चिं. मनपाचे अधिकऱ्यांमार्फतच कायदयाचा भंग करत व नियम तोडुन करण्यात येत आहे, तसेच सदर नाला हा वाहता नाला असल्याने त्यास ब्लु लाईन, रेड लाईन व ग्रिन लाईन यांचेही मोजमाप देण्यात आलेले आहे. असे असतानाही सदर बाबतचा कोणताही पुर्ण विचार न करता संबंधीत पिं. चिं. मनपाचे अधिकाऱ्यांनी
स्वतःचीच बनवलेले नियमावली हे तोडण्याचे काम केलेले आहे जे कायदयाच्या दृष्टीने अनैतीक व नागरिकांवर अन्याय करणारे आहे. तरी सदर ठिकाणी नाल्यात चाललेले बांधकाम ताबडतोप पाडण्यात यावे, तसेच सदर ठिकाणी नियमांचे भंग करून अनाधिकृतपणे बांधकाम करणारे पर्यावरण अभियांत्रिकी विभागाच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांकडून
बांधकामांकरीता झालेला खर्च वसूल करण्यात यावा तसेच संबंधीत सर्व अधिकाऱ्यांवर अनाधिकृत बांधकामाचे नियमांनुसार त्याच प्रमाणे कामात हलगर्जीपणा व पदाचा गैरवापर करण्याच्या कारणावरून कायदेशिर कारवाई करण्यात यावी.
तसेच सदर बाबत हा प्रथम अर्ज मा. आयुक्तांसमक्ष सादर केला असुन, सदर अर्जामधील संपुर्ण मजकुर हा प्रत्यक्ष पहाणी नुसार खरा व बरोबर असुनही जर यावर मा.आयुक्त साहेब यांनी प्रत्यक्ष पहाणी करून त्वरीत कायदेशिर कार्यवाही करण्यास विलंब करून पिं. चिं. मनपाचे आयुक्त यांनी सदर गैरप्रकाराकडे काना डोळा केल्यास सदर अनाधिकृत बांधकाम व नियमभंगाच्या प्रकारामध्ये मा. आयुक्त साहेब यांचाही सहभाग आहे असे ग्राहय धरून मे. न्यायालयात दाद मागण्यात येईल, सदर कामी त्वरीत व ताबडतोब करण्यात आलेली कार्यवाही व त्यासंबंधीत सर्व कागदपत्रे व अहवाल यांच्या प्रती हे कार्यवाहीनुसार देण्यात यावे. असे सचिन उद्धव शिंदे यांनी पत्राद्वारे मा. आयूक्त शेखर सिंह यांना कळवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!