आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व अध्यक्षपदी गणेश नरसिंग कलवले यांची नियुक्ती जाहीर..

प्रतिनीधी पिंपरी-चिंचवड दि. ०३ नोव्हेंबर २०२५ आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व १४ नोव्हेंबर २०२५ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व मातंग समाज बांधवांच्या सोबत बहुजन समाज बांधवांना घेऊन प्रबोधन पर्व साजरा करण्यात येतो. त्यासंदर्भात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन यमुनानगर या ठिकाणी बैठक पार पडली.
या बैठकीला पिठासीन अधिकारी म्हणून जेष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे यांनी काम पाहिले एकुण तीन उमेदवार उभे होते. यामध्ये गणेश कलवले यांची मतदानाच्या रूपाने निवड करण्यात आली.
यावेळी जेष्ठ नेते तथा पिटासीन अधिकारी भाऊसाहेब अडागळे, मा अध्यक्ष भगवान शिंदे, नाना कसबे, संजय,ससाने, अरूण जोगदंड, युवराज दाखले, डी पी खंडाळे, रामदास कांबळे, सुनिल भिसे, अशाताई शहाने, आद्यक्रांतीगुरू प्रबोधन पर्व माजी अध्यक्ष संजय धुतडमल, बाबासाहेब पाटोळे, सा.लो. आण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष बाबासाहेब रसाळ, नानासाहेब कांबळे, शिवाजी चव्हाण,भाऊ कसबे, विशाल कसबे, अविनाश शिंदे, शंकर खवळे, शिवाजीराव खडसे, मंगेश डाखोरे, अविनाश गायकवाड, सचिन दोनघव, अरूण लोंढे, ओमकार गायकवाड, विजय डोंगरे, स्वत्निल वाघमारे, अनिल तांबे, नाथा शिंदे, सागर कांबळे, आनंद कांबळे, यशवंत ससाने, कृष्णा वाघमारे, कैलास पाटोळे, भारतीताई चांदणे, वैशाली जाधव, यांच्या सह समाज बांधव उपस्थित होते.



