अभिनंदनउत्सवक्रीडादेश-विदेशपूणेमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

“सुवर्ण पदक “विजेती चंद्रिका पुजारी म्हणजे ताडीवाला रोड भागातील तुफानातील दिवे”..

प्रतिनिधी पूणे दि. ४ नोव्हेंबर २०२५ डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्या वतीने नुकत्याच बहिरन येथे झालेल्या आशियायी युवा क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना बॉक्सिंग स्पर्धेत ५४ किलो वजनी गटात ” सुवर्ण पदक “विजेती पूण्यातील ताडीवाला रोड भागाची लेक, देशाची सुवर्णकन्या कु. चंद्रिका पुजारी हिचा नागरी सन्मान करण्यात आला या वेळी चंद्रिकाचे स्वागत सदर भागातील सामाजिक कार्यकर्ते – स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी – शालेय विद्यार्थी – शरीरसौष्ठव पटू यांनी टाळ्यान्च्या गजरात केले तिने केलेल्या अतुलनीय कामगिरी बद्दल शौर्याचे प्रतीक असणाऱ्या “भीमा कोरेगाव विजयस्तंभाची प्रतिकृती” देऊन सुजितजी यादव यांनी तिचा सन्मान केला या वेळी उपस्थित सर्वांनीच तिच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली व कौतुक केले या वेळी उपस्थित चंद्रिकाचे कुटुंबीय, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष सुजितआप्पा यादव, जेष्ठ काँग्रेस नेते हाजीभाई नदाफ, शहर काँग्रेस चिटणीस राहुल तायडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते गौतम सवाने, राष्ट्रवादी युवक शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. मयुर गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते धनंजय कांबळे, प्रमोद गायकवाड, राजू आल्हाट आदी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन जगताप यांनी केले. तर कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचे अध्यक्ष संतोष हंगरगी, संदीप कांबळे, हरीश काकडे, ईश्वर गायकवाड, महेश वाघमारे, राम गायकवाड, रणवीर कांबळे, अनिल जाधव, फारुख शेख, अहमद पटेल यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!