स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी अभिवादन..

मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांची वढू बुद्रुक येथे भेट..
प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. १८ नोव्हेंबर २०२५ स्वराज्यरक्षक आणि शौर्यपरंपरेचे प्रतीक छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बुद्रुक येथील पावन समाधीला पिंपरी चिंचवड शहराचे मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी आज भेट देऊन अभिवादन केले.
या भेटीदरम्यान तुळापूर येथील भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष श्री. नवनाथ शिवले तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष शिवले यांनी समाधी परिसरात सुरू असलेल्या सुशोभीकरण आणि सर्वांगीण विकासकामांची सविस्तर माहिती देत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून दिली. या कामांची पाहणी करताना परिसरात उभे राहताच जाणवणारे शांत वातावरण, दृश्यरम्य रचना आणि ऐतिहासिकतेशी प्रामाणिक राहणारी बांधणी हे सर्व समाधीच्या पावनतेला अधिक अधोरेखित करणारे ठरल्याचे सचिन चिखले यांनी नमूद केले. त्यांच्या शब्दांत “ही कामे केवळ विकासकामे नाहीत तर इतिहासाची जागृति, परंपरेचा सन्मान आणि भविष्यातील पिढ्यांना छ.संभाजीराजांच्या शौर्याची प्रेरणा देणारी स्मृतीस्थाने आहेत.” या प्रसंगी उद्योजक रोहिदास शिवणेकर , विठ्ठल मांडेकर, उमेश शिंगाडे यांच्यासह अन्य मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित होते.



