
प्रतिनीधी सतिश पाटील मुंबई दिं १८ नोव्हेंबर २०२५ मुंबई ससून डॉक येथे पिढ्यानपिढ्या मासळी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या भूमिपुत्र कोळी समाजावर गुरुवारी मोठा आघात झाला. कोणतीही पूर्वसूचना, नोटीस किंवा संवाद न करता केंद्र व राज्य सरकारच्या यंत्रणांनी अचानक धडक कारवाई करत सुमारे १५० वर्षे जुनी १७-१८ गोदामे आणि ६०-७० कार्यालये जबरदस्तीने रिकामी करून पोलिस बंदोबस्तात सील केली.
या कारवाईमुळे हजारो कोळी बांधवांचा दिवसागणिक चालणारा मासेमारी व्यवसाय तात्काळ ठप्प झाला असून, त्यांच्या उदरनिर्वाहावर मोठे संकट कोसळले आहे. दीर्घ परंपरा, वारसा आणि पिढ्यांपिढ्या चालत आलेली व्यवसायिक ओळख एका दिवसात हिरावून घेतल्याची भावना कोळी समाजात तीव्र स्वरूपात आहे.
कोळी समाज लवकरच मोठ्या आंदोलनाची तयारी करत आहे.
स्थानिक नेते, सामाजिक संघटना आणि मत्स्य व्यवसायातील सर्व घटकांनी एकत्र येत ससून डॉक वाचवण्यासाठी लढा देण्याचा निर्धार केला असल्याचे समजते.



