राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धा २०२५ उद्घाटन समारंभ राजाराम भिकू पठारे स्टेडियम, खराडी येथे संपन्न..

प्रतिनिधी पूणे दि. २४ नोव्हेंबर २०२५ राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांच्या परंपरेला पुढे नेत २० ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राजाराम भिकू पठारे स्टेडियम, खराडी – पुणे येथे भव्य राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील तरुण खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर आपली क्षमता सिद्ध करण्याची ही गौरवास्पद संधी असून स्पर्धेचे वातावरण अत्यंत उत्साही व स्पर्धात्मक पाहायला मिळत आहे.
देशातील विविध राज्यांतून तब्बल ५०० हून अधिक स्पर्धक, प्रशिक्षक, तांत्रिक अधिकारी, तसेच वेगवेगळ्या राज्य संघटनांचे मान्यवर पदाधिकारी स्पर्धेत सहभागी झाले आहेत. विशेषत: त्रिपुरा, मेघालय, पश्चिम बंगाल, राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, चंदीगड आणि महाराष्ट्र इत्यादी राज्यांचा उल्लेखनीय सहभाग प्राप्त झाला आहे.
ही स्पर्धा राष्ट्रीय किकबॉक्सिंग फेडरेशनच्या दृष्टीने तसेच महाराष्ट्रासाठीही अत्यंत प्रतिष्ठेची ठरत आहे.
उद्घाटन समारंभ (२१ नोव्हेंबर २०२५, सायं. ०५.०० वा.संपन्न)
स्पर्धेचा भव्य उद्घाटन समारंभ माननीय आमदार श्री. बापूसाहेब पठारे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित असलेले मान्यवर
मांजरी गावचे माजी सरपंच श्री. शिवराज आप्पा घुले,
समाजसेवक श्री. पुरुषोत्तम धारवाडकर, माजी उपसरपंच श्री. सुमित आप्पा घुले, महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष सी. ए. तांबोळी, नॅशनल किकबॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष श्री. बापूसाहेब घुले, संयोजक अध्यक्ष व चार वेळा राष्ट्रीय विजेता श्री. अतुल घुले, संयोजक सचिव श्री. नितीन मुळे, राष्ट्रीय एरोबिक्स संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष व किकबॉक्सिंग राष्ट्रीय तांत्रिक चेअरमन श्री. संतोष खैरनार, राष्ट्रीय थायबॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष श्री. पी. वाय. आतार,
किकबॉक्सिंग राष्ट्रीय रिंग स्पोर्ट्स प्रमुख व आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री. जयदेव महमाने, संयोजन समिती प्रमुख श्री मिलिंद श्रीराम, श्री कैलास टिकोळे, सदस्या सौ. श्रद्धा शिंगारे-नवले, पल्लवी किरवे, ओंकार किरवे, प्रियंका बडेकर, वैशाली घोडके, श्रुती घोडके, श्रवण घोडके, रोहन कांबळे, विवेक मोहिते इत्यादी आणि तसेच इतर अनेक मान्यवर, क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक व संघटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नॅशनल किकबॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष श्री. बापूसाहेब घुले यांनी सर्व मान्यवर पाहुण्यांचे व खेळाडूंचे मनःपूर्वक स्वागत करून स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाची माहिती दिली.
उद्घाटन सोहळ्यानंतर विविध वजनगटांतील स्पर्धांना औपचारिक प्रारंभ झाला.
स्पर्धेचे महत्व
‘देशातील किकबॉक्सिंग खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याचे मोठे व्यासपीठ’ व भावी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी संभाव्य खेळाडूंची निवड
राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
महाराष्ट्रात किकबॉक्सिंग खेळाच्या प्रसाराला मोठी चालना.



