उत्सवकलाक्रीडामूंबईविशेषशहरशैक्षणिक

संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वक्तृत्व, चित्रकला, कुस्ती व कबड्डी या स्पर्धा मोठ्या दिमाखात संपन्न..

प्रतिनीधी सतिश पाटील मुंबई दि २८ नोव्हेंबर २०२५ पाईपलाईन विभागीय विद्या प्रसारक मंडळ टेमघर ता. भिवंडी जि. ठाणे या  संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित वक्तृत्व, चित्रकला, कुस्ती व कबड्डी या  स्पर्धांमधील पहिली स्पर्धा स्व. दादू गोविंद म्हात्रे व मंजुळाबाई करसन तरे यांच्या स्मरणार्थ  आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संविधान दिनी दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी स्व. वामन झिपरू गुळवी सभागृहात मोठ्या उत्साहाने संपन्न झाली.
       सदर स्पर्धेचे उद्घाटन  श्री. प्रदीप करसन तरे  यांसह श्री. विश्वनाथ महाराज नाईक, श्री. योगेश गुळवी,  संस्थेचे संचालक , श्री. गोपीनाथ मधुकर चौधरी (उपाध्यक्ष), श्री. शिरीष सिताराम नाईक (सचिव), जनार्दन सोंग्या चौधरी (कोषाध्यक्ष), राम काळूराम पाटील (सहसचिव), बाळाराम मामा चौधरी (अध्यक्ष माध्यमिक विभाग), श्री. शत्रुघ्न शांताराम नाईक, जगदीश नारायण म्हात्रे, राजेश बाबल्या भोईर, रोहिदास चौधरी, संजय राजाराम चौधरी, वसंत गुरुजी, बाळाराम भोईर, शुभांगी चौधरी, श्री. सदानंद म्हात्रे व संस्थाअध्यक्ष श्री. प्रेमनाथ सखाराम नाईक  यांनी केले.
    स्व. कृष्णा नथू तरे गुरुजी, स्व.गुरुनाथ दादू चौधरी गुरुजी  व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमातून १९७५ साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित पहिल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे लहान गटातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक शारदा विद्या मंदिर प्राथमिक शाळा अनगाव, भिवंडी या शाळेचा विद्यार्थी कु. अभंग स्वप्निल पाटील, तर मोठ्या गटातील  प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कु. सिद्धी हेमंत गपाट शाळा – सौ. शा. ना. लाहोटी विद्यालय अनगाव भिवंडी या विद्यार्थ्यांनी पटकावला,
उर्वरित निकाल पुढील प्रमाणे..
लहान गट – ३री ते ७वी
द्वितीय क्रमांक – कु. विधि मुकेश केणे इयत्ता ५वी (ओंकार इंग्लिश स्कूल सोनार पाडा , कल्याण),
तृतीय क्रमांक – वेदांत अनंता जाधव इयत्ता ६ वी (सौ. शा. ना लाहोटी विद्यालय अनगाव, भिवंडी ),
उत्तेजनार्थ- मनहा जमीर अहमद शेख इयत्ता ७ वी (पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय भिवंडी),
उत्तेजनार्थ – रश्मी मनोज काळे इयत्ता ४ थी (जि. प. शाळा मानकोळी भिवंडी)
मोठा गट (आठवी ते बारावी)
द्वितीय क्रमांक – प्राजक्ता रमेश शेलवले (विद्या मंदिर हायस्कूल शिवळे, मुरबाड),
तृतीय क्रमांक- सारा संतोष घरत (NES इंग्लिश मिडीयम भिवंडी),
उत्तेजनार्थ १ तन्वी भरत जाधव (शारदा विद्या मंदिर, अनगाव, भिवंडी),
उत्तेजनार्थ  २ अल्फीया अल्ताफ शेख (हेरा इंग्लिश स्कूल, भिवंडी)
स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना श्री प्रदिप तरे यांच्या माध्यमातून रोख रक्कम व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
तसेच स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना श्री. जुगल छत्रपती दिवेकर, श्री. दिनेश कृष्णा भोईर, श्री. सदानंद गणपत म्हात्रे यांच्या माध्यमातून “वक्तृत्वाची गुरुकिल्ली” हे भाषणांचे पुस्तक तर सौ. श्रध्दा सत्यवान पाटील यांच्या  कवितांची पुस्तके देण्यात आली.
  स्पर्धेचे परीक्षण श्री. तुषार देवरे (कल्याण) व श्री. नरेश वाळंज सर (भिवंडी) यांनी केले.
    स्पर्धेसाठी  शाळेचे प्राचार्य श्री. खामकर सर यांसह श्री. गोरख फुलोरे, श्री. हनुमान लोहार, राधा नाईक, सदानंद पाटील,  दलाल सर, प्रीतम वाळज, राजू नागावकर, भाविका भोईर,  स्टेला नाडार, अंजली तरे या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.
श्री. प्रदीप कर्सन तरे यांनी आपल्या मनोगतात स्पर्धेच्या यशस्वीतेबद्दल विशेष कौतुक केले. तर संस्थेचे उपाध्यक्ष श्री. गोपीनाथ चौधरी व अध्यक्ष श्री. प्रेमनाथ नाईक यांनी स्पर्धेसाठी कु. अनन्या सदानंद म्हात्रे व कु. संस्कृती सदानंद म्हात्रे यांनी दिलेल्या अडीच लाख देणगीचे विशेष कौतुक करून दरवर्षी ही स्पर्धा मोठ्या दिमागदार स्वरूपात आयोजित करण्याबाबत मनोगत व्यक्त केले.
   स्पर्धेचे सूत्रसंचालन संचालिका शुभांगी चौधरी मॅडम व श्री. दलाल सर यांनी केले तर आभार प्रदर्शन वक्तृत्व स्पर्धा प्रमुख श्री. सदानंद म्हात्रे सर यांनी केले. प्रमुख अतिथी श्री. सतिश वि.पाटील (अनुवाद आपला न्युजचे मुंबई विभागाचे पत्रकार) यांचा सत्कार व त्यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्याचा मान ही देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!