‘व्हीजेटीआय प्रथम’ या संकल्पनेचा निर्धार करूया. डॉ. सचिन कोरे संचालक व्हीजेटीआय..

प्रतिनिधी दि. २८ नोव्हेंबर २०२५ “भारतीय संविधान दिवस साजरा करताना ज्याप्रमाणे ‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्पना मनात रुजवली जाते त्याचप्रमाणे व्हीजेटीआयचे कर्मचारी म्हणून ‘व्हीजेटीआय प्रथम’ या भावनेचा संकल्प आजच्या संविधान दिनाच्या निमित्ताने प्रत्येक कर्मचाऱ्याने केला पाहिजे,”
अशा भावना व्हीजेटीआय चे संचालक डॉ. सचिन कोरे यांनी व्यक्त केल्या. व्हीजेटीआय मागासवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे ‘भारतीय संविधान दिवस’ दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ ला संघटनेच्या कार्यालयात साजरा केला त्याप्रसंगी ते बोलत होते.
संस्था संचालक डॉ. सचिन कोरे सर, यांच्या हस्ते सविधान प्रतिमेचे पूजन व भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
भारतीय संविधानाच्या ५१ A मध्ये नमूद केलेल्या ‘नागरिकाचे कर्तव्य’ या कलमानुसारच संचालकांनी या अपेक्षा व्यक्त केल्याची पुस्ती मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे संस्थापक प्रा प्रवीण देशमुख यांनी जोडली.
भारतीय संविधानाच्या संदर्भातील अनेक महत्त्वपूर्ण बाबी त्यांनी अगदी मोजक्या शब्दामध्ये उपस्थित समोर मांडल्या.
भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेमध्ये नमूद केलेल्या सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, या शब्दांच्या अतिशय मोजक्या शब्दातील अर्थ संस्थेचे अधिष्ठाता डॉ. के. के. सांगळे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
आपल्या हक्कांची जशी जाणीव प्रतेकात आहे त्याचप्रमाणे भारतीय संविधानाने जी कर्तव्ये सांगितलेली आहेत त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे, त्याबाबत जागृत राहायला पाहिजे, अशी भावना संस्थेचे उपसंचालक डॉ आर एन आवळे यांनी व्यक्त केली.
सध्याची पाकिस्तान सह इतर देशांची झालेली अवस्था पाहता त्याला धार्मिक विद्वेषाची झालर असल्याचे तसेच ज्या देशांनी एका धर्माची कास धरली त्यांची अवस्था बिकट झाल्याचे, त्याचवेळी विविध भाषा, संस्कृती सह हजारो जाती- जमातीमध्ये विभागलेला हा भारत एकसंघ राहिला ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीची देणं असल्याचे मत व निरीक्षण लोकसत्ताचे उपसंपादक श्री. उन्मेश देशमुख साहेब यांनी प्रमुख वक्ते म्हणून नोंदवले.
संघटनेचे अध्यक्ष डॉ प्रमोद वानखडे त्यांनी संघटनेची ३३ वर्षाची वाटचाल व संविधान दिवस याबाबत प्रस्तावना सादर केली.
संघटनेचे माजी अध्यक्ष सदानंद तांबे साहेब तसेच आमंत्रित शिक्षक वृंद डॉ संदीप कोटकर सर, प्रा. सागर कदम सर, प्रा. शेंडे सर, श्री गोपाळ धारपावर, तसेच वसतिगृह रेक्टर डॉ. विनोद सूर्यवंशी यांनी आपले संविधान दिनानिमित्य मनोगत व्यक्त केले. इतर संघटनेचे पदाधिकारी – शिवसेना कामगार सेना यूनिट चे अध्यक्ष श्री सावंत व सेक्रेटरी श्री संदीप कदम, मनसे कामगार यूनिट चे अध्यक्ष श्री निलेश नाईक तथा सेक्रेटरी श्री दिलीप पंधीरे इत्यादी मान्यवर कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमास मेस कर्मचारी वृंद श्री सुमेध जाधव, श्री जोशी व इतर लोक तसेच हाऊस किपिंग विभागातील श्री विनोद वाल्मिकी, सुनील वाघेला, राजेश सोळंकी, व मेंटेनेस विभागातील इंजीनियर श्री बागटे साहेब, श्री नरेंद्र सदांशिव यांचे विशेष सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष डॉ. डी पी काकड सर व आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव श्री फिरोज शेख यांनी केले.



