अभिवादनउत्सवदेश-विदेशपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरसंपादकीय

२६ नोहेंबर २०२५ भारतीय संविधान दिनाचा ७५वा सिल्व्हर जुब्ली वर्धापन दिन पिंपरीत उत्साहात साजरा..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २९ नोव्हेंबर २०२५ दोन दिवसांपूर्वी २६ नोहेंबर २०२५ रोजी भारतीय संविधान दिनाचा ७५वा सिल्व्हर जुब्ली वर्धापन दिनानिमित्त B S 4 याकार्यक्रमा अंतर्गत मुलनिवाशी संघ पिंपरी चिंचवड शहर आणि सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटनेच्या माध्यमातून भिमसृष्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी येथे अती उत्साहात साजरा करण्यात आला.
मुल निवासी संघ पिंपरी चिंचवड शहर आणि सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी संयुक्त रित्या संविधान दिनाचा जागर करण्यासाठी रॅलीचे आयोजन केले, स्वराज्य निर्माते, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एच.ए.कॉलनी समोरील पुतळ्यास ढोली बाजा लाउन, वाजत गाजत जाऊन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच रॅली नेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आणि वाजत गाजत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाकडे येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटनेचे संस्थापक भिमरत्न प्रा.बी.बी.शिंदे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. हरिश्चंद्र शिंदे, राज्य कार्याध्यक्ष मा. दत्ताभाऊ गायकवाड, राज्य उपाध्यक्ष मा. अशोक जावळे, पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी अध्यक्ष मा. विक्रम वाघमारे, पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी कार्याध्यक्ष मा.भारत घरड. मुळनिवासी संघाच्या महिला कार्यकारिणी उपाध्यक्षा मा. सुनिताताई गायकवाड, मा. स्मिताताई अंबुटे, यांनी देखिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी भिमसृष्टी मध्ये संविधानावर व्याख्यान आयोजित केले.
व्याख्यानाचा विषय होता संवीधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला राष्ट्रवाद व राज्य समाज वाद, आणि आजची परिस्थिती.
यावेळी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य बामसेफचे उपाध्यक्ष मा. संजय अंबुटे होते.
सुरवातीला भारतीय संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटना, संस्थापक प्रा. बी. बी. शिंदे, मा.स्मिताताई अंबुटे, महाराष्ट्र राज्य मुळ निवासी संघ अध्यक्ष मा.अरुण कांबळे, प्रशिक्षण सचिव मा. विश्वनाथ वाघमारे, केंद्रीय सदस्य ॲड. मोहन सोनवणे, मा.धर्मराज जगझाप यांनी सुंदर असे मार्मिक मनोगत व्यक्त केले. तर गायक झुंजार सुरेश ठाणांबीर आणि सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मा. गोविंद गाडे यांनी आपल्या गायनातुन विशेष असे प्रबोधन केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये मा.भारत मोरे, मा. बाळू शिंदे, मा. सतिश धावटे, मा.बालाजी गवळी, मा.सतिश वाघमारे, सिनीयर लगाडे, कांबळे मॅडम, माणिक खंडागळे, तसेच सर्व हारा उत्कर्ष समाज संघटनेचे प्रमूख मा.हरिश्चंद्र शिंदे, मा.दत्ताभाऊ गायकवाड, मा.देविदास पारधे, मा.अशोक जावळे, मा.विक्रम वाघमारे, मा. भारत घरड, मा. परमेश्वर कांबळे, मा.गोविंदगाडे, मा.धर्मराज जगझाप उपस्थित होते.
यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मा.ॲड. रमेशजी सरोदे सरांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!