उत्सवमहाराष्ट्रविशेषसामाजिक
नदीला पाणी आल्याने; निमसाखर परिसरात आनंदाचे वातावरण!..

प्रतिनिधी गणेश धनवडे निमसाखर ता. इंदापूर दि. १० जून २०२६ निमसाखर ता. इंदापूर परिसरातील ग्रामस्थांसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरला. अनेक दिवसांनंतर निरा नदीच्या पात्रात पाणी आल्याने शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीच्या प्रवाहामुळे परिसरातील विहिरी, भूजल पातळी आणि शेतीला मोठा दिलासा मिळणार आहे.
“निरा वाहू लागली, निमसाखर हसू लागले” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. नदीचे पात्र पुन्हा एकदा जलमय झाल्याचे सुंदर दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी नदीकाठावर गर्दी केली होती.



