अपघातमहाराष्ट्रमूंबईशहरसामाजिक

भांडूपमध्ये बेस्ट बसने १३ जणांना चिरडलं, ०४ जनांचा मृत्यू , रात्रीच्यावेळी धक्कादायक घटना,

प्रतिनीधी सतिश पाटील मुंबई दि. ३० डिसेंबर २०२५
मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. भांडूप रेल्वे स्थानकाजवळील बस डेपो जवळ बेस्ट बसने १३ प्रवाशांना चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत ०४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. लोक कामावरून घरी जात असताना गर्दीच्या वेळी हा अपघात झाला आहे. भांडूप स्टेशन वेस्टला झालेल्या या अपघातामुळे मुंबई हादरली आहे. या घटनेत साधारण १० जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
रात्रीच्या वेळी बसने प्रवाशांनी चिरडले
समोर आलेल्या माहितीनुसार रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली आहे. लोक कामावरून घरी जात असताना या ठिकाणी मोठी गर्दी होती, या गर्दीच्या वेळी चालक बस रिवर्स घेताना बस प्रवाशांना धडकली. त्यामुळे अनेक प्रवाशी बसखाली चिरडले गेले. यामुळे घटनास्थळी आरडाओरडा आणि पळापळ सुरू झाली. उपस्थित लोकांनी जखमींना बसखालून बाहेर काढले आणि तातडीने उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात दाखल केले.
*०४ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी*
भांडूप स्टेशनजवळ बेस्ट बस रिव्हर्स घेत असताना झालेल्या या अपघातात ०३ महिला आणि ०१ पुरुष अशा ४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका अज्ञात महिलेचा समावेश आहे, तिचे वय अंदाजे ३१ वर्षे असल्याचे समोर आले आहे. तसेच प्रशांत लाड या ५१ वर्षीय प्रवाशाची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातानंतर बसचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिस आणि बेस्ट कर्मचारी घटनास्थळी दाखल, तपासाला सुरूवात
या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल, पोलिस, बेस्ट कर्मचारी आणि 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पोलिस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी उपस्थित आहेत आणि घटनेचा तपास सुरू आहे. या घटनेच्या वेळी बस चालवत असलेल्या ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे अशी माहिती समोर आली आहे. चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!