आंदोलनगून्हापूणेमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

अखेर सरते-शेवटी रूबी हॉल क्लिनिक व्यवस्थापनावर गुन्हा दाखल …

प्रतिनिधी पुणे दि. 25 जानेवारी 2026 सुनिता पांडुरंग भगत, वय ५५ राहणार शिंदे वाडी ता. माळशिरस, जिल्हा पुणे या १८ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ४ वाजता रूबी हॉल क्लिनिक, पुणे स्टेशन या रूग्णालयात दाखल झाल्या त्यांना न्यूमोनिया हा आजार असल्याचे सांगितले त्यातच त्यांचा मृत्यू १९ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११ वाजता झाला. रात्राची वेळ असल्याने नातेवाईकांनी रूबी हॉल क्लिनिक मध्ये उपलब्ध असलेल्या शवागृहात ठेवण्याचा निर्णय घेतला.
२० जानेवारी २०२६ सकाळी १० वाजता नातेवाईक संपूर्ण बील भरून मृतदेह शवागृहातून घ्यायला गेले तेव्हा त्यांना गेटपास काढून या असे सांगितले गेले. ते गेटपास काढण्यासाठी गेले असता तिथल्या कर्मचाऱ्यांनी वेळकाढूपणा करण्यासाठी उडवा उडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली. गेटपास द्यायला टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
सरतेशेवटी सकाळी १० पासून गेटपास मिळवण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांना दुपारी ३.३० वाजता यश मिळाले.
मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी शवागाराच्या बाहेर शववाहिका उभी केली होती. साधारणपणे ४ वाजता रूग्णालयाच्या बाहेरून आलेल्या एका रूग्णवाहिकेमध्ये मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना सुनिता भगत यांचा मृतदेह आढळून आला. रात्री नातेवाईकांनी सह्या करून रूग्णालयाच्या ताब्यात दिलेला मृतदेह बाहेर आढळून आला आणि तब्बल ८ तास रूग्णालयाच्या बाहेर होता हे प्रकरण गंभीर आहे असे लक्षात घेऊन मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी ११२ ला फोन करून पोलीसांना बोलावून घेतले. रूग्णालयाच्या एकाही कर्मचारी किंवा रूग्णालय प्रशासन यापैकी कोणीही मृतदेह ताब्यात द्यायला समोर आले नाहीत ते सर्व कर्मचारी पळून गेले. पुढे नातेवाईकांनी पोलीसांच्या उपस्थितीत मृतदेह ताब्यात घेतला. रात्री मृतदेह ठेवत असताना स्वच्छ पांढऱ्या कपड्याच्या आवरणात तोंड आणि संपूर्ण मृतदेह व्यवस्थीत झाकण्यात आला होता पण दुपारी जेव्हा मृतदेह ताब्यात घ्यायची वेळ आली तेव्हा मृतदेह रक्ताळलेल्या कापडामध्ये अव्यवस्थित होता. यामुळे नातेवाईकांनी पोलीसात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. चार दिवसांच्या मुक सत्याग्रह आंदोलनाने आणि अथक परिश्रमाने सरतेशेवटी गुन्हा दाखल करण्यात आला. बलाढ्य रूग्णालया विरूद्ध सामान्य माणूस यामध्ये सामान्य माणसाचा तात्पुरता विजय झाला. न्यायालयीन लढाईचा पुढचा मार्ग सुकर झाला.
या संघर्षाचे साथीदार जांबुवंत मनोहर, निखिल पाटील, अजित जाधव आणि मृत व्यक्तीचे नातेवाईक यश भगत, जेष्ठ विधीज्ञ ॲड. मोहन वाडेकर आणि जेष्ठ विधीज्ञ ॲड असिम सरोदे यांचे विशेष आभार. असे यासंदर्भात माहिती देताना नागेश भारत भोसले यांनी आमच्याशी बोलताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!