अनधिकृतमहाराष्ट्रमूंबईविशेषशहर

नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने बेलापूर विभागात अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि: 24 जानेवारी 2026 बेलापूर विभागात अनधिकृत झोपडपट्ट्यांवर निष्कासनाची कारवाई, नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने बेलापूर विभागात अनधिकृत झोपडपट्ट्यांवर धडक निष्कासन कारवाई करण्यात आली. ही कारवाई मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
करावे गाव, सेक्टर–३८ येथील प्लॉट क्रमांक १५८ समोरील नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानासाठी राखीव भूखंडावर अतिक्रमण करून सुमारे २९ कच्च्या खोल्यांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. संबंधितांना हे बांधकाम स्वयंहून हटविण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्या सूचनांचे पालन न झाल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे बेलापूर विभाग कार्यालयामार्फत दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी तोडक कारवाईचे आयोजन करून सदर अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी प्रशांत नेरकर, सहाय्यक अभियंता आत्माराम काळे यांच्यासह विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कारवाईसाठी १० मजूर, १ जेसीबी तसेच आवश्यक मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा वापर करण्यात आला. यावेळी अतिक्रमण विभागाचे पोलिस अधिकारी, कर्मचारी व सुरक्षारक्षक देखील तैनात होते.
महापालिकेच्या वतीने यापुढेही अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!