पिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला महापौरपद देणे हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल..

शिवशाही व्यापारी संघ संस्थापक/अध्यक्ष युवराज दाखले यांची मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा..

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. 30 जानेवारी 2026 उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत व विकासात मोलाचे योगदान आहे. त्यांच्या या योगदानाचा सन्मान राखत, तसेच त्यांना श्रद्धांजली म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद देऊन मोठेपण दाखवावे, अशी अपेक्षा शिवशाही व्यापारी संघ संस्थापक/अध्यक्ष तथा सकल मातंग समाज प्रदेश समन्वयक लोकसेवक युवराज दाखले यांनी व्यक्त केली आहे.
युवराज दाखले म्हणाले, की सध्या राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत असून, स्व. अजितदादा पवार हे महायुतीतील अत्यंत महत्त्वाचे व प्रभावी नेते होते. राज्याच्या राजकारणासोबतच विकास प्रक्रियेत त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. विशेषतः पिंपरी-चिंचवड शहराच्या औद्योगिक, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या विकासकामांमध्ये अजित पवार यांची दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून येते.
युवराज दाखले पुढे म्हणाले की, राजकारणात मतभेद असू शकतात; मात्र विकासासाठी काम करणाऱ्या नेत्याचा सन्मान हा सर्वपक्षीय असायला हवा. स्व. अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरासाठी दिलेले योगदान लक्षात घेता, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रवादी काँग्रेसला महापौरपद देणे हा एक सकारात्मक आणि समन्वयाचा संदेश देणारा निर्णय ठरेल.
असा निर्णय घेतल्यास महायुती सरकारकडून राजकीय परिपक्वता, सलोखा आणि विकासाला प्राधान्य देण्याची भूमिका अधोरेखित होईल, तसेच राज्यातील नागरिकांमध्येही सकारात्मक संदेश जाईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना ई-मेल द्वारे विनंती पत्र ही पाठवले असल्याचे शिवशाही व्यापारी संघ संस्थापक/अध्यक्ष युवराज दाखले यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!