आंदोलनपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रशहरसामाजिक

निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे बस टर्मिनलच्या नावाचे झालेले विडंबन तात्काळ दुरुस्ती करा:- युवराज दाखले

प्रतिनीधी पिंपरी चिंचवड दि. 19 फेब्रुवारी 2026 साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या निगडी येथील पूर्णाकृती स्मारकाच्या पाठीमागे बी आर टी बस टर्मिनल आहे.
या बी आर टी बस टर्मिनल वरील साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचे विडंबन महामेट्रोचे काम करत असताना झालेले आहे ही अत्यंत गंभीर बाब महामेट्रोचे मुख्य व्यवस्थापक श्रावण हर्डीकर साहेब यांना निवेदनाद्वारे कळविले आहे.
दरम्यान शिवशाही व्यापारी संघ प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे म्हणाले की, सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने दुरुस्तीचे आदेश न दिल्यास लोकशाही मार्गाने संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करावे लागेल असा इशारा ही यावेळी देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!