ई-चलन विरोधात लातुर मध्ये चक्का जाम आंदोलन..

प्रतिनिधी सतिश पाटील दि. ०६ मार्च २०२६ लातुरात ई-चलन विरोधात वाहन मालकांचे रणकंदन. ई-चलनचा जाच थांबवा, आरटीओ कार्यालयात खासगी वाहन मालकांचा तांडव.
ई-चलनच्या जाचाला कंटाळून आता खासगी वाहन मालकांनी थेट तीव्र पवित्रा घेतलाय. दंडाच्या नावाखाली होणारी लूट थांबवा, या मागणीसाठी आरटीओ कार्यालयाला अक्षरशः वेढा घालण्यात आला होता. नुसती घोषणाबाजी नाही, तर आरटीओच्या दारात गाड्या आडव्या लावून चक्का जाम करण्यात आला होता.
हा आक्रोश आहे त्या वाहन मालकांचा, ज्यांच्या खिशाला ई-चलनच्या अवाढव्य दंडानं भगदाड पाडलंय. पुकारलेला एल्गार आणि आरटीओ प्रशासनाचा उडालेला थरकाप. हे दृश्य आहे आजच्या आंदोलनाचं. खाजगी मोटार मालक संघटनेने आज आरटीओ कार्यालयाचा श्वास रोखला.
केवळ गेटवरच नाही, तर आंदोलक थेट साहेबांच्या दालनापर्यंत पोहोचले. अधिकाऱ्याच्या केबिनबाहेर ठिय्या मारून बसलेल्या या मालकांनी प्रशासनाला धारेवर धरलं. चलन रद्द करा, नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणांनी आरटीओ परिसर दणाणून गेला.
आता चेंडू प्रशासनाच्या कोर्टात आहे. एकीकडे वाहन मालक आक्रमक आहेत, तर दुसरीकडे आरटीओ प्रशासन नियमावर बोट ठेवून बसलंय. यावेळी आंदोलकांनी प्रशासन विरोधात तिव्र नाराजी व्यक्त केली.



