अनधिकृतअवैधपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

चाकण MIDC येथील माळुंगे शिंदे वासुली, खालुंब्रे येथे खुलेआम अवैधरित्या गॅस भरणा केंद्राचा सुळसुळाट…

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १० मार्च २०२६ पिंपरी चिंचवड शहरालगत चाकण MIDC येथे मागील काही दिवसांपासून अवैध गॅस भरणा केंद्राचा सुळसुळाट वाढला आहे. घरगुती वापराचे तसेच व्यावसायिक वापराचे गॅस सिलेंडर घेऊन एका मशीनच्या सहाय्याने एका गॅस सिलेंडर मधून गॅस दूसऱ्या गॅस सिलेंडर मध्ये गॅस भरला जात आहे. या गॅस सिलेंडरचा वापर वाहनांमध्ये केला जात असावा. या अवैध व्यवसायामुळे अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एखाद्या वेळी एका सिलेंडर मधून दुसऱ्या सिलेंडर मध्ये गॅस भरताना निष्काळजीपणा झाल्यास मोठी दुर्घटना देखील घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. खुलेआम मार्केट मध्ये पिंपरी चिंचवड शहरालगत माळुंगे येथे शिंदे वासुली, खालुम्ब्रे गावात काही ठिकाणी अशा प्रकारचे गॅस भरणा केंद्रच सुरू असल्याचे समजते.
या संदर्भात तहसीलदार, मालमत्ता गुन्हे शाखा, माळुंगे पोलीस स्टेशन यांनी कारवाई करण्यात टाळाटाळ करताना दिसते आहे. या परिसरात जाणिव पूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. उद्या काही मोठा अपघात घडला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न ज्येष्ठ नागरिक महिला करीत आहेत. पुढे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांच्या वतिने केली गेली आहे. स्थानिकांनी अशी माहिती दिली की अनेक महिन्यापासून इथे अवैध गॅस भरणा केंद्र सूरू आहे. कारवाई करण्याच्या नावावर दुर्लक्ष होत आहे. तरी या अशा अवैध गॅस भरणा केंद्रांवर प्रशासन कारवाई करणार का?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!