महाराष्ट्रमूंबईविशेषसामाजिक

भांडुप स्टेशन पश्चिम कपड्याच्या दुकानाला भीषण आग!

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. १५ मार्च २०२६ भांडूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत,’एस’ विभाग कपड्याच्या पाच व एक ज्युस सेंटर अशा सहा दुकानांना भीषण आग लागली.
कोणतीही जीवीत हानी झाली नाही असा अंदाज आहे पण दुकानांची जवळ जवळ बेचिराग झाली घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल व भांडुप पोलीस हजर झाले आणि आग आटोक्यात आणण्याचा शर्थीने प्रयत्न चालू केले. आग का लागली याचा प्राथमिक तपास भांडुप पोलीस ठाणे अधिकारी, अग्निशमन दल व महाराष्ट्र वीज मंडळ करीत आहेत अशी माहिती मिळते. आग लागल्यावर सर्व दुकानदार आपले जीव व सामान हलवण्यात व्यस्त होते. कदाचित इलेट्रीक शॉर्टसर्किट ने आग लागली असावी असा अंदाज आहे. बर्याच माध्यमातून मोबाईल दुकानात आग लागली अशी बातमी व विडिओ व्हायरल होत आहे तरीही घटना स्थळी कपडे विक्रीची दुकाने आहेत. आग भडकण्याचे कारण दुकानाच्या छतावर पुठ्ठे व प्लास्टिक, यामुळे आग वाढल्याचे वाटते कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे पालिसांच्या वातीने सांगण्यात येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!