पिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रशहरसामाजिक
रुपीनगर निगडी मधे भंगार दुकानाला भीषण आग या मध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १६ मार्च २०२६ निगडी रुपीनगर येथे काल दि. १५ मार्च रोजी भंगार दुकानाला भीषण आग दुपारच्या सुमारास लागली, ही माहिती समजताच मनसेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी सर्व प्रथम अग्निशमन दलाला फोन करून तातडीने येण्याची विनंती केली व स्व:ता काही कार्यकर्ते सोबत घेवून घटनास्थळी मदतीला पोहचले. काही क्षणातच अग्निशामक दल ही घटनास्थळी दाखल झाले व आग आटोक्यात आणली या मध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण भंगार दुकानाशेजारील एक बस पुर्ण जळुन खाक झाली. मोठ्या प्रमाणात आग लागली असल्याने आजु बाजूला असलेल्या नागरिकांची मोठी गर्दी झाली होती सर्व सामाजिक कार्यकर्ते व आजी माजी नगरसेवक घटनास्थळी मदतीसाठी उपस्थित होते.



